---Advertisement---

आता हा भारतीय देणार विंडीज क्रिकेटपटूंना फलंदाजीचे धडे!

On: बुधवार, डिसेंबर 4, 2019 7:11 PM
---Advertisement---

शुक्रवारपासून सुरू होणार्‍या भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडीजने बुधवारी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माॅटी देसाई यांची नियुक्ती केली आहे. देसाई यांना दोन वर्षाचा करार देण्यात आला आहे. 

त्यामुळे आता ते भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात शुक्रवारी हैद्राबादला होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याआधी वेस्ट इंडीज संघाशी जोडले जातील.

12 वर्षांच्या कारकीर्दीत देसाई यांनी अफगाणिस्तान, नेपाळ, कॅनडा तसेच आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स व गुजरात लायन्स या संघांबरोबर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच याआधी देसाई युएई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते.

भारत विरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ 15 डिसेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

देसाई यांच्या नियुक्तीबद्दल वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स म्हणाले, “मी यापूर्वी माँटीबरोबर काम केले आहे आणि तो एक चांगला प्रशिक्षक आहे. खेळाडूंची प्रतिभा सुधारण्याची आणि त्यांनी सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांच्यात सुधारणा करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे माँटीने सिद्ध केले आहे.’

तसेच देसाई म्हणाले, “संघाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक शक्य योगदान देण्यासाठी मी मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स आणि क्रिकेट संचालक जिमी अ‍ॅडम्स आणि आमच्या कर्णधारांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---