अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या पुरुष टी20 विश्वचषकाआधी वेस्टइंडीज क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केलेला अनुभवी फलंदाज जॉन कॅम्पबेल याच्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आलीये.
जमैका अँटी-डोपिंग आयोगाच्या (जेएडीसीओ) निर्णयानुसार, कॅम्पबेलवर डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तीन सदस्यीय स्वतंत्र पॅनेलने शुक्रवारी (7 ऑक्टोबर) दिलेल्या 18 पानांच्या निर्णयात कॅम्पबेलवर नमुना संकलन सादर करण्यास टाळाटाळ, नकार किंवा चाचणी अयशस्वी झाल्याचे आरोप ठेवले.
कॅम्पबेल याने वेस्ट इंडिजकडून 20 कसोटी, 6 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. चालू वर्षी बांगलादेशविरुद्ध तो अखेरच्या वेळी वेस्ट इंडीजसाठी खेळताना दिसला होता. याचवर्षी एप्रिलमध्ये किंग्स्टन येथील त्याच्या घरी गेलेल्या अँटी डोपिंग विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याने रक्ताचे नमुना देण्यास नकार दिला होता.
‘जमैका अँटी-डोपिंग आयोगाच्या नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल कॅम्पबेलवर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. पुराव्यांच्या आधारे, पॅनेलला असे आढळले नाही की कॅम्पबेलचे डोपिंग विरोधी उल्लंघन हेतुपुरस्सर नव्हते,” असे निकालात म्हटले आहे. या प्रकरणात खेळाडू 4 वर्षांच्या कालावधीसाठी निलंबनास पात्र ठरत आहे. कॅम्पबेलवरील ही बंदी 10 मे पासून विचारात घेतली जाईल.
सध्या 29 वर्षांच्या असलेल्या कॅम्पबेलने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आपल्या 20 सामन्यांच्या कसोटी कारकीर्दीत त्याच्या नावे 888 तर 6 वनडेमध्ये 248 धावा जमा आहेत. यादरम्यान त्याने एक शतकही ठोकले होते. 2019 वनडे विश्वचषकावेळी तो वेस्ट इंडीज संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये समाविष्ट होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!






