---Advertisement---

वेस्ट इंडीजने इभ्रत राखली! झिम्बाब्वेला पराभूत केल्याने मुख्य फेरीच्या आशा कायम

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 5:05 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (19 ऑक्टोबर) पहिल्या फेरीतील दोन सामने खेळले गेले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात दोन वेळचे विश्वविजेते वेस्ट इंडीज व झिम्बाब्वे हे संघ आमने-सामने आले. करा अथवा मरा अशा स्थितीत हा सामना खेळत असलेल्या वेस्ट इंडीजने शानदार सांघिक कामगिरीचा नमुना दाखवत 31 धावांनी विजय मिळवला. गोलंदाजांनी एकत्रितपणे केलेल्या नियंत्रित गोलंदाजीने वेस्ट इंडिज संघ या सामन्यात विजय साकार करू शकला.

 

ब गटातील हा सामना होबार्ट येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात स्कॉटलंडकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या वेस्ट इंडिजसाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कायले मायर्स झटपट बाद झाला. मात्र, त्यानंतर एविन लुईस व जॉन्सन चार्ल्स या जोडीने 49 धावांची भागीदारी केली. चांगली फटकेबाजी करत असलेला चार्ल्स 45 धावा काढून दुर्दैवीरित्या धावबाद झाला. कर्णधार निकोलस पूरन याचे अपयश कायम राहिले. उपकर्णधार रॉवमन पॉवेलने 28 तर अकिल होसेनने 23 धावा करत संघाला 7 बाद 173 पर्यंत पोहोचवले. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझाने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले.

पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या झिम्बाब्वेने या सामन्यातही 2.2 षटकात 29 धावा करत आक्रमक सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. अल्झारी जोसेफ याच्या वेगापुढे झिम्बाब्वेचे फलंदाज टिकू शकले नाहीत. त्यांनी नियमित अंतराने बळी गमावले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ल्युक जॉंगवेने संघासाठी सर्वाधिक 29 धावा केल्या. परिणामी, झिम्बाब्वे संघ 122 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडीजसाठी जोसेफने 16 धावात 4 तर जेसन होल्डरने 12 धावांत 3 बळी मिळवले. वेस्ट इंडीजने आयर्लंडविरुद्धच्या आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्यास ते मुख्य फेरीसाठी पात्र होतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना? एका क्लीकवर मिळवा सगळी माहिती 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---