वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने आधीच मालिका खिशात घातलेली. या सामन्यात भारताचे सलामीवीर कर्णधार शिखर धवन व शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा संघाला मजबूत सुरुवात दिली. या जोडीने सलग तिसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करताना यजमान संघाला पुरते हैराण केले.
शिखर-गिलची आणखी एक भक्कम भागीदारी
या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी भेटलेल्या शिखर धवनने शानदार खेळ दाखवला. तसेच जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करत असलेल्या गिलनेही सर्वांची मने जिंकली. तिसऱ्या सामन्यात या दोघांनी भारतीय संघाला ११३ धावांची सलामी दिली. दोघांनीही यादरम्यान मालिकेतील आपले दुसरे-दुसरे अर्धशतक साजरे केले. धवनच्या रूपाने भारतीय संघाला धक्का बसला. धवन ७ चौकारांसह ७४ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. भारतीय संघाची तीन सामन्यांच्या मालिकेतील ही दुसरी शतकी सलामी भागीदारी ठरली.
तिन्ही सामन्यातही पावर प्ले भारताच्या नावे
शिखर आणि गिल या जोडीने मालिकेतील तिन्ही सामन्यात वेस्ट इंडीज संघाला पावर प्लेमध्ये यश मिळू दिले नाही. दोघांनीही पहिला सामन्यात शतकी भागीदारी केली होत. त्या सामन्यात त्यांनी अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना पावर प्लेमध्ये बिनबाद ७३ धावा चोपलेल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिजचे गोलंदाज पावर प्लेमध्ये भारताच्या सलामी जोडीला बाद करू शकले नाहीत. या सामन्यात त्यांनी ४२ धावा काढलेल्या. आता अखेरच्या सामन्यातही त्यांनी पावर प्लेमध्ये ४५ धावा काढत मजबूत धावसंख्येचा पाया रचला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया जिंकतेय खरी; पण या कमजोरीवर जाईना कोणाचेच लक्ष
टी२०त हीट, तर वनडेत फ्लॉप! टीम इंडियाचे टेंशन वाढवतोय ‘हा’ खेळाडू
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला