श्रीलंका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिकेचा थरार चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार रोजी (०२ एप्रिल) पार पडला. अतिशय चुरशीची लढत झालेला हा सामना शेवटी अनिर्णीत राखण्यात पाहुण्या श्रीलंकेला यश आले. दरम्यान वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू जेसन होल्डर याने विरोधी संघाचा फलंदाज धनंजय डी सिल्वा याला स्लेज करण्याचा प्रयत्न केला.
त्याचे झाले असे की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेनन गॅब्रियल गोलंदाजी करत होता. यावेळी श्रीलंकाचा यष्टीरक्षक फलंदाज धनंजय आणि दिनेश चंडीमल मैदानावर होते. अशात रिकामा वेळ मिळताच होल्डरने धनंजयला डिवचले. त्याने सुरुवातीला अप्रत्यक्षपणे गोलंदाज शेननला म्हटले की, ‘शेनन तू यष्टीवर निशाणा साधून गोलंदाजी का करत आहेस? आधीच श्रीलंकाचे फलंदाज बॅकफुटवर आहेत.’
एवढ्यावरच होल्डर थांबला नाही. तर त्याने पुढे नॉन स्ट्राईकरवर उभा असलेल्या धनंजयकडे पाहिले आणि म्हटले ‘धनंजय तुला आठवण आहे ना. तू शेवटच्या वेळी जेव्हा इथे आला होतास; तेव्हा तुझा हात तुटला होता.’
होल्डरची स्लेजिंग ऐकून रागाला जाण्याऐवजी धनंजयला हसू फुटले. तो होल्डरकडे पाहून हसू लागला. सहसा धनंजय कधीही विरोधी संघाचा खेळाडू आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू इच्छित असेल; तर तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांची स्लेजिंग हसण्यावारी घेताना दिसतो.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने धनंजय आणि होल्डरच्या या मजेदार प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
Sound on for some chirp from Jason Holder😆 🔊 "Shannon what you bowlin fuh at the stump, they already on de backfoot!"#WIvSL #MenInMaroon pic.twitter.com/QOxESeUzTm
— Windies Cricket (@windiescricket) March 30, 2021
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ३५४ धावा केल्या होत्या. यात कर्णधार क्रेग ब्रेथवेटच्या शतकी खेळीचा मोठा वाटा राहिला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ २५८ धावांवरच गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २८० धावा चोपल्या आणि श्रीलंकाला विजयासाठी ३७७ धावांचे आव्हान दिले. श्रीलंकाच्या फलंदाजांनी या आव्हानाचा पाठलाग करताना १९३ धावा केल्या. मात्र सामन्याचा कालावधी संपल्याने सामना अनिर्णीत सुटला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल ट्रायलसाठी बारावी बोर्डाची परिक्षा सोडली; आता भल्याभल्यांना आपल्या फिरकीने करतोय गारद
प्रत्येकाने मंदिरातील घंटा समजून ‘पंत’ची वाजवली; भारतीय दिग्गजाचा कडवट आठवणींना उजाळा
बीसीसीआयची चिंता शिगेला! आयपीएल आधी वानखेडे स्टेडियमचे ‘इतके’ ग्राउंड्समन कोरोना पॉझिटिव्ह