---Advertisement---

ज्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांनीच केले किंग कोहलीचे कौतुक

On: गुरूवार, जानेवारी 24, 2019 8:27 PM
---Advertisement---

आयसीसीने नुकतेच जाहिर केलेल्या 2018 च्या पुरस्करांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाच बोलबाला राहिला आहे. त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.

त्याचा आयसीसीने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरव केला आहे. याचबरोबर विराटने यावर्षीचा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा आणि कसोटीपटूचाही पुरस्कार मिळवला आहे.

यावेळी विराटच्या या यशाचे कौतुक खुद्द दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांनीच केले आहे.

‘तुझ्यामुळे माझा दिवस सर्वोत्तम ठरला’ असे कोहलीचे कौतुक सोबर्स यांनी मिड-डेशी बोलताना केले.

विराट हा उत्तम व्यक्ती आहे. मी त्याला पहिल्यांदा त्रिनिदादमध्ये भेटलो होतो. पुरस्काराबद्दल त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, असे सोबर्स म्हणाले.

एकाच वर्षात आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू हे तीनही महत्त्वाचे पुरस्कार मिळवणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

तसेच आयसीसीने विराटला वन-डे आणि कसोटी यांच्या सर्वोत्तम संघांचे कर्णधारही बनवले आहे.

2018मध्ये विराटने 13 कसोटी सामन्यांमध्ये खेळताना 55.08च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 शतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर 14 वन-डे सामन्यात 133.55या अप्रतिम सरासरीने आणि 6 शतकांच्या मदतीने 1202 धावा केल्या आहेत. तर 10 टी20 सामन्यात 211 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहली दिग्गज आहे का? आयसीसीच्या या प्रश्नावर चाहत्यांनी दिल्या खास प्रतिक्रिया

मोहम्मद शमीने जलद १०० विकेट्सचा विक्रम केला या खास व्यक्तीला समर्पित

तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४० वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment