भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका लवकरच सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना 12 जुलैपासून डॉमिनिकामध्ये सुरू होणार असून यासाठी वेस्ट इंडीजचा संघ घोषित केला गेला आहे. नियमित कर्णधार क्रेक ब्रेथवेट याच्या नेतृत्वातील या संघात 13 खेळाडूंची निवड केली आहे. पण त्यांच्या दोन प्रमुख खेळाडूंचे नाव या संघात नाहीये.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या 13 सदस्यीय संघात वेस्ट इंडीज संघ व्यवस्थानासाठी दोन निर्णय कठीण राहिले असावे. संघ व्यवस्थापनाने कायल मेअर्स (Kyle Mayers) आणि नक्रमा बोनर यांना संघातून वगळले आहेत. मेअर्सने संघासाठी खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे नक्रमा बोनर वेस्ट इंडीजने खेळलेल्या शेवटच्या कसोटीत खेळला नव्हता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीज संघाने आपला शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
दोन सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडीजला 2-0 अशा पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील शेवटच्या सामन्यात मेअर्सचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते. पण त्यानंतर तो खराब फॉर्ममध्येच दिसला आहे. विश्वचषक क्वॉलिफायर्समध्येही त्याच्याकडून अपेक्षित प्रदर्शन करण्यात आले नाही. परिणामी वेस्ट इंडीज संघ विश्वचषक खेळण्यासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2023-25 हंगामाची सुरुवात भारत आणि वेस्ट इंडीज संघ आगामी कसोटी मालिकेतून करणार आहेत. (West Indies squad announced for the first Test against India)
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडीज संघ
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टॅगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मैकेंजी, रेमन रीफर, केमर रोच, जोमेल वारिकन.
पहले टेस्ट के लिए टीम इंडिया का स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
महत्वाच्या बातम्या –
‘बिचारा कुलदीप’, बागेश्वर बाबासोबत फिरकीपटूचा फोटो व्हायरल होताच चाहत्याची लक्षवेधी कमेंट
स्मिथच्या 100व्या कसोटीत मोईन अलीचे अनोखे द्विशतक, दिग्गजाची विकेट काढत घडवला इतिहास