दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (south africa) एकदिवसीय आणि कसोटी मालिकांतील पराभवानंतर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आता मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी कायरन पोलार्डच्या(kieron pollard) नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज (west indies) संघ मंगळवारी (१ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे दाखल झालेला आहे.
या संघाला आता तीन दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. या तीन दिवसांच्या क्वारंटाईननंतर हा संघ मैदानात सरावासाठी उतरणार आहे. ६ फेब्रुवारीला या दोन संघांमध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना होईल, तर ९ आणि ११ फेब्रुवारीला दूसरा आणि तिसरा सामना पार पडणार आहे. हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड आणि अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी या मालिकेसंदर्भात मोठ व्यक्तव्य केले आहे. पोलार्ड या मालिकेची आतूरतेने वाट पाहत आहे. तर जेसन होल्डरने म्हटले आहे की, कॅरेबियन संघात एवढी ताकद आहे की, भारताला त्यांच्या घरात झोडपून काढू शकतो.
वेस्ट इंडीज संघ इंग्लंडला टी २० मालिकेत पराभूत करुन आता भारतीय संघासोबत एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी २४ तासांच्या प्रवासानंतर अहमदाबाद येथे पोहोचला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सोशल मिडीयावर फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
After a long couple days of travel from Barbados, the #MenInMaroon have arrived in India! ✌🏿 #INDvWI 🏏🌴 pic.twitter.com/ogvbrtQqTy
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट बोर्डाने अहमदाबाद विमानतळावरुन एक व्हिडीओ शेअर करत म्हटल आहे कि, ‘आम्ही ६ फेब्रुवारीपासुन भारतासोबत खेळण्यास तयार आहोत.’ या व्हिडीओमध्ये वेस्ट इंडीज संघ एकत्रपणे पुढे जाताना दिसत आहेत. त्यांच्यामागे त्यांचे प्रशिक्षक फिल सिमंस जाताना दिसत आहेत. या दौऱ्याला यशस्वी बनवण्याची जबाबदारी कर्णधार कायरन पोलार्ड आणि फिल सिमंस यांची असणार आहे.
WI arrive safely in Ahmadabad! ✈️ 🇮🇳
The #MenInMaroon have a quick turnaround, as WI get ready to play @BCCI in 3 ODI’s here, starting on February 6 #INDvsWI 🏏🌴 pic.twitter.com/WSHvHKoqVA
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022
भारतीय संघ आणि वेस्ट इंडीज संघ एकदिवसीय मालिकेनंतर ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. टी२० मालिका कोलकत्ता येथे खेळवली जाणार आहे. तसेच आयपीएल २०२२ चा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडणार आहे. या लिलावात या खेळाडूंनी सुद्धा नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे या लिलावात या खेळाडूंवर सुद्धा पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारत एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल(उपकर्णधार),ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, दीपक चहर, रिषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, वाॅशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयससाठी ‘या’ संघाने राखून ठेवलेत तब्बल २० कोटी
शुबमन रमला ऐतिहासिक गाबा कसोटीच्या आठवणींत
‘किंग कोहली’चा १०० वा कसोटी सामना असेल खास! जाणून घ्या नेमक कारण