सध्या यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर दोन बलाढ्य संघ द्विपक्षीय मालिकेत आमने सामने येणार आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने मालिका रद्द केल्यानंतर आता वेस्ट इंडिज संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी (४ नोव्हेंबर) याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “वेस्ट इंडिज संघ १३ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान कराचीमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.”
वेस्ट इंडिज संघ २०१८ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या मालिकेत देखील दोन्ही संघांनी ३ सामने खेळले होते. टी-२० मालिकेतील पहिला सामना १३ डिसेंबर, दुसरा सामना १४ डिसेंबर तर तिसरा सामना १६ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना १८ डिसेंबर, दुसरा सामना २० डिसेंबर तर अंतिम सामना २२ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. या दोन्ही संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला होता. न्यूझीलंड संघाने पहिल्या वनडे सामन्यातील नाणेफेक झाल्यानंतर संपूर्ण दौरा रद्द केला होता. त्यानंतर इंग्लंड संघाने देखील मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
🚨 PCB has confirmed that West Indies will travel to Pakistan in December to play 3 T20Is and 3 ODIs at National Stadium, Karachi.
Tour details: https://t.co/8nPZ2p48Oo pic.twitter.com/0NTLbi9tfE
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) November 4, 2021
वेस्ट इंडीज- पाकिस्तान मालिकेचे वेळापत्रक
टी-२० मालिका
१)पहिला टी-२० सामना – १३ डिसेंबर, २०२१, कराची
२)दुसरा टी -२० सामना – १४ डिसेंबर, २०२१,कराची
३)तिसरा टी -२० सामना , १६ डिसेंबर, २०२१,कराची
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ डिसेंबर, २०२१,कराची
२)दुसरा वनडे सामना, २० डिसेंबर,२०२१,कराची
३)तिसरा वनडे सामना, २२ डिसेंबर, २०२१,कराची
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडशी भिडण्यासाठी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला भारत, अश्विनने दिली मदतीची ‘ऑफर’
मॅथ्यू वेडच्या हातून झेल सुटला अन् हुकली ऍडम झम्पाची हॅट्रिक, दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल
नामिबियाला धूळ चारत सेमीफायनलचा मार्ग सोपा करण्यावर न्यूझीलंडची नजर, पराभूत झाल्यास भारताचा फायदा