वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (27 जुलै) सुरुवात होईल. कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर या मालिकेत देखील सरशी साधण्याचा रोहित शर्मा व भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात दोन्ही संघ कसे समीकरण घेऊन उतरतात तसेच कोठे हा सामना पाहता येईल हे आपण जाणून घेऊया.
उभय संघांमध्ये पहिला वनडे सामना 27 जुलै रोजी होईल. तर, दुसरा सामना 29 जुलै रोजी खेळला जाईल. हे दोन्ही सामने बार्बाडोस येथे होणार आहेत. मालिकेतील अखेरचा सामना एक ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथे होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होतील. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण डी स्पोर्ट्स तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ऍपवर होईल.
भारतीय संघ या सामन्पायात पाच च फलंदाज व तीन अष्टपैलूंसह उतरू शकतो. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व उमरान मलिक तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी मिळू शकते. दुसरीकडे यजमान संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामन्यात सरशी साधण्याचा प्रयत्न करेन.
पहिल्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
पहिल्या सामन्यासाठी संभाव्य वेस्ट इंडीज संघ: शाई होप (कर्णधार), ब्रेंडन किंग, कायले मेयर्स, ऍलेक अथानेझ, रॉवमन पॉवेल, शिमरन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ओशेन थॉमन, केविन सिंक्लेअर, रोमारिओ शेफर्ड व यानिक कॅरीयाह.
(West Indies V India 1st ODI Preview Playing XI Live Telecast)
महत्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे