वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. या सामन्यात फिल सॉल्टनं दमदार फलंदाजी केली. त्यानं आपल्या कारकिर्दीतील तिसरं टी20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. विशेष म्हणजे, त्यानं तिन्ही शतकं वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत.
या सामन्यात एक अशी घटना पाहायला मिळाली, ज्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. वेस्ट इंडिजच्या गुडाकेश मोतीनं सीमारेषेवर एका हातानं असा अद्भुत झेल घेतला, जो पाहून फलंदाज जोस बटलरला देखील विश्वास बसला नाही. या झेलमुळे बटलरचा डाव पहिल्याच चेंडूवर संपुष्टात आला.
वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर कर्णधार जोस बटलर फलंदाजीला आला. तो आपल्या डावातील पहिल्याच चेंडूचा सामना करत होता. बटलरनं रोमॅरियो शेफर्डच्या चेंडूवर फटका मारल्यावर चेंडू थर्ड मॅनकडे गेला. चेंडू हवेत होता आणि गुडाकेश मोती थर्ड मॅनच्या उजव्या बाजूला उभा होता. त्यानं चेंडूकडे धाव घेतली आणि हवेत उडी मारून एका हातानं तो पकडला. असा करताना त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला, मात्र चेंडू किंवा त्याच्या शरीराचा सीमारेषेला स्पर्श झाला नाही.
अशाप्रकारे हा झेल पकडला गेला, जे पाहून जोस बटलर देखील आश्चर्यचकित झाला. गुडाकेश मोतीनं हा झेल कसा पकडला याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. चेंडू जवळपास त्याच्यापासून दूर निघून गेला होता, मात्र त्यानं आपल्या डाव्या हातानं झेल घेतला. काही मायक्रो सेकंदांचाही विलंब झाला असता, तर चेंडू सीमारेषेपलीकडे गेला असता आणि बटलरला षटकार मिळाला असता. तुम्ही या झेलचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
One of the BEST grabs you’ll ever see! 🙌🏾🤩#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/8Sag2rTn9a
— Windies Cricket (@windiescricket) November 9, 2024
हेही वाचा –
मेगा लिलावापूर्वी इंग्लिश खेळाडूचे शानदार शतक, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
नीरज चोप्राचा मोठा निर्णय, तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियनला बनवले प्रशिक्षक
SL VS NZ; भारताला क्लीन स्वीप केलेल्या किवी संघाचे पराभव, श्रीलंका मालिकेत 1-0 ने पुढे