तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका लाजिरवाण्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत जो क्वचितच कोणत्याही संघाला तोडायला आवडेल. अनेक संघांनी संयुक्तपणे हा विक्रम 14 वेळा नोंदवला आहे, परंतु कोणीही तो मोडू शकलं नाही. हा कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंचा विक्रम आहे.
अलीकडेच, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघातील तब्बल 11 खेळाडू शून्यावर बाद झाले, जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कसोटी सामन्यात संयुक्तपणे सर्वाधिक खेळाडू शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंची शून्यावर बाद होण्याची ही एकूण 14वी घटना आहे. 30 ऑगस्ट 1988 रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वप्रथम 11 खेळाडू शून्यावर बाद झाले होते. यानंतर ही घटना 13 वेळा घडली आहे. मात्र एकाही कसोटी सामन्यात 11 पेक्षा जास्त खेळाडू शून्यावर बाद झालेले नाहीत.
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावे होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 160 धावांत गारद झाला. नंतर वेस्ट इंडिजनं 97 धावांत 7 विकेट गमावल्या. पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. मात्र, त्यानंतर आफ्रिकन संघानं दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून सामन्यावरील पकड घट्ट केली.
दुसऱ्या दिवशी यजमानांचा डाव 144 धावांवर आटोपला होता. यानंतर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 263 धावांचं लक्ष्य होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान संघ 222 धावांवरच ऑलआऊट झाला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 40 धावांनी जिंकला.
हेही वाचा –
दिलदार श्रेयस! रस्त्यावरील गरीब महिलेची मदत करून जिंकलं सर्वांचं मन
“गोलंदाज बॅटमागे लपत नाहीत, ते हुशार असतात”, जसप्रीत बुमराहनं ठोकला कर्णधारपदाचा दावा
मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन कधी होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट