श्रीलंका विरूद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला गुरूवारपासून सेंट ल्युसिया येथून सुरूवात झाली. श्रीलंकन कर्णधार दिनेश चांदिमलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
सलामीला आलेल्या कुसल परेरा – महेला उदावत्ते हि जोडी संघाला चांगली सुरूवात करून देण्यास अपयशी ठरले. पदार्पण करणारा महेला उदावत्ते दुसऱ्याच षटकात गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला.
धनंजय डि सिल्वा(१२), कुसल परेरा(३२), हे खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार दिनेश चांदिमल आणि कुसल मेंडिस या दोघांमध्ये ६७ धावांची भागीदारी झाली. हि जम बसलेली जोडी फोडण्यात कर्णधार जेसन होल्डरला यश आले, मेंडिस(४५) धावांवर डॉवरिचकडे झेल देऊन बाद झाला.
एका बाजूने विकेट पडत असताना चांदिमल खेळपट्टीवर एकटाच पाय रोवून उभा होता. चांदिमलने शेवटपर्यंत एकाकी झुंज देत शेवटी तो ११९ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेचा पहिला डाव ७९ षटकात २५३ धावांवर सर्वबाद झाला.
खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळतेय. शॅनन गॅब्रिएलने कारकिर्दित तिसऱ्यांदा पाच बळी मिळवले. केमर रोचने चार बळी मिळवत दुसऱ्या बाजूने गॅब्रिएलला चांगली साथ दिली.
वेस्ट इंडीज सलामीवर फलंदाजीसाठी मैदानात उतरले पण दोनच षटकांचा खेळ होऊ शकला. विंडीजने पहिला कसोटी सामना जिंकला असून मालिकेत १-० ने आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला
–टाॅप ५- फिफा विश्वचषक आणि क्रिकेट विश्वचषकातील हे आहेत ५ मोठे फरक
–तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात