---Advertisement---

फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला

On: शुक्रवार, जून 15, 2018 4:07 PM
---Advertisement---

मॉस्को। 14 जूनपासून 21 व्या फिफा विश्वचषकाला सुरवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान रशिया विरुद्ध सौदी अरेबिया संघात पार पडला. या सामन्यात रशियाने सौदी अरेबियावर 5-0 असा सहज विजय मिळवला.

हा सामना पाहण्यासाठी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा त्याच्या पत्नीसह उपस्थित  होता. तसेच त्याने सामन्याबरोबरच उद्घाटन सोहळ्याचीही मजा घेतली.

रोहित सध्या मॉस्कोत सुट्टीची मजा घेत आहे. तो पहिला अमेरिकेत होता त्यानंतर तो मॉस्कोत आला. याचे फोटो रोहितने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरु असलेल्या कसोटी सामन्यासाठी रोहितची निवड न झाल्याने त्याला ही सुट्टी मिळाली आहे.

त्याची या सामन्यानंतर होणाऱ्या आयरलँड दौऱ्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड झाली आहे.

भारताचा आयरलँडचा दौरा 27 जूनपासून सुरु होणार आहे. यादौऱ्यानंतर लगेचच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात

पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की!

व्हायच होतं डॉक्टर पण झाला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment