वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर सुरू झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जागी वेगवान गोलंदाज आवेश खानला संधी देण्यात आली. यजमान संघाने देखील ब्रूक्स व किमो पॉल यांना बाहेरचा रस्ता दाखवत ब्रेंडन किंग आणि डेवॉन थॉमस यांना संधी दिली.
West Indies have won the toss and will bowl first in the 2nd T20I.
Live – https://t.co/C7ggEOTWOe #WIvIND pic.twitter.com/c4atgQn9nt
— BCCI (@BCCI) August 1, 2022
उभय संघ प्रथमच सेंट किट्स प्रथमच खेळत आहेत. खेळाडूंचे साहित्य पोहोचण्यास उशीर झाल्याने सामना नियोजित वेळेपेक्षा तीन तासाने उशिरा सुरू होत आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल म्हणून भारतीय संघात आवेश खानला संघात संधी दिली गेली आहे.
वेस्ट इंडीजने मागील सामन्यात धिम्या गतीने खेळलेल्या ब्रूक्सच्या जागी अनुभवी सलामीवीर ब्रेंडन किंगला संघात सामील करून घेतले. तसेच अष्टपैलू किमो पॉल याच्या जागी डेवॉन थॉमस याला संधी दिली गेली.
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी उभय संघ-
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
वेस्ट इंडीज-
ब्रेंडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक/कर्णधार), कायले मेयर्स, जेसन होल्डर, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेद मेकॉय, डेवॉन थॉमस.
महत्त्वाच्या बातम्या–