आयसीसी महिला टी20 विश्वचषक (ICC Women’s T20 World Cup) ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. त्यासाठी वेळापत्रक याआधी जाहीर देखील करण्यात आलं आहे. तत्पूर्वी महिला वेस्ट इंडिज (Women’s Team West Indies) संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या डिएंड्रा डॉटिननं (Deandra Dottin) तिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ती पुन्हा वेस्ट इंडिजकडून टी20 विश्वचषक खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
वेस्ट इंडिजच्या (West Indies) इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या डॉटिनच्या नावावर महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकाॅर्ड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके झळकावणाऱ्या डॉटिनने काही वर्षांपूर्वी संघातील वातावरणामुळे आश्चर्यकारकपणे निवृत्ती जाहीर केली होती. परंतू तिनं आता निवृत्ती मागे घेऊन वेस्ट इंडिज संघात खेळण्याची मंजुरी दिली आहे.
डॉटिननं सीडब्ल्यूआयला पत्र लिहलं की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजचे अध्यक्ष डॉ. किशोर शॅलो यांच्यासह सर्वांशी चर्चा केल्यानंतर, मला हे सांगताना आनंद होत आहे की, मला आवडत असलेल्या खेळात परत येण्यास मी उत्सुक आहे. वेस्ट इंडिज महिला संघासाठी सर्व फॉरमॅटमध्ये मी माझे सर्वोत्तम योगदान देऊ इच्छिते.”
पुढे तिनं लिहलं की, “मला विश्वास आहे की माझा अनुभव, परिपक्वता आणि कौशल्ये संघात मोलाची भर घालतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मी प्रत्येक सामन्यात आणि प्रशिक्षण सत्रात माझे सर्वोत्तम देण्यास तयार आहे. याव्यतिरिक्त, मी तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आमच्या प्रदेशातील महिला क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.”
🚨 BREAKING NEWS🚨
The World Boss is back!😎Deandra Dottin has announced her availability for International selection for the West Indies Women team.
Full details⬇️https://t.co/S1RnFmU0tX#MaroonWarriors pic.twitter.com/zmgHoCnCoA
— Windies Cricket (@windiescricket) July 27, 2024
डिएंड्रा डाॅटिननं (Deandra Dottin) वेस्ट इंडिजसाठी 143 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 3,727 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिची सरासरी 30.54 आहे. तर स्ट्राईक रेट 79.09 आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 22 अर्धशतक आणि 3 शतक आहेत. त्यामध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 150 आहे. 127 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिनं 25.68च्या सरासरीनं 2,697 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 12 अर्धशतक आणि 2 शतक आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 112 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे.. हे काय? श्रीलंकेच्या या गोलंदाजाच्या कृतीने वेधलं अख्या क्रिकेट जगताचं लक्ष
सूर्यकुमार यादवला ‘SKY’ बनवणारा खेळाडू कोण? सूर्यानं केला मोठा खुलासा!
काय सांगता? टी20 चा खरा किंग तर सूर्या, एकदा पाहाच नव्या कर्णधाराचा हा भीम पराक्रम