सध्या वेस्ट इंडिज महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला (West Indies women’s vs south africa women’s team) संघांमध्ये ४ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने ८ धावांनी विजय मिळवत, मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून वॉलवॉर्ट आणि तैजमिन ब्रिट्स यांनी पहिल्या गडीसाठी ५३ धावांची भागीदारी केली होती. दक्षिण आफ्रिका संघाकडून सुने लुसने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली होती. तर लॉरा वॉलवॉर्टने २५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका महिला संघाला १६० धावा करण्यात यश आले होते.
वेस्ट इंडिज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना डिआंड्रा डॉटिनने ३७ धावांची खेळी केली. तर चेडेन नेशेनने ३५ धावांचे योगदान दिले होते. वेस्ट इंडिज संघाचा डाव देखील अवघ्या १६० धावांवर संपुष्टात आला होता.
सुपर ओव्हर सामन्याचा थरार
सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून डिआंड्रा डॉटिनने अवघ्या ५ चेंडूंमध्ये १९ धावांची खेळी केली. तर मॅथ्यूजने १ चेंडूंमध्ये ६ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिज संघाने सुपर ओव्हरच्या षटकात २५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या १७ धावा करण्यात यश आले होते. दक्षिण आफ्रिका संघाकडून तस्मिन ब्रिट्सने ४ चेंडूंमध्ये १० धावांची खेळी केली. तर क्लो ट्रायॉनने २ चेंडूंमध्ये ७ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या :
हेलिकॉप्टर शॉट मारण्यात अफगाणिस्तानचा ‘या’ फलंदाजाची धोनीलाही टक्कर, पाहा व्हिडिओ
U19 World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मिळाली ‘ही’ गुड न्यूज
आयपीएलच्या इतिहासातील ५ खोट्या गोष्टी चाहत्यांना वाटतात खऱ्या, जाणून घ्या त्यामागचे सत्य