---Advertisement---

वेस्ट इंडिजची विश्वचषकात विजयी सुरुवात, पहिल्यांदाच न्यूझीलंडला मायदेशात चारली पराभवाची धूळ

West-Indies-Women
---Advertisement---

न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलद्वारा (आयसीसी) आयोजित महिला वनडे विश्वचषक स्पर्धा २०२२ (Women World Cup 2022) ची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना (First Match) शुक्रवारी (०४ मार्च) यजमान न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (NZ vs WI) संघात झाला. वेस्ट इंडिजने ३ धावांनी हा सामना जिंकला असून त्यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. हा त्यांचा न्यूझीलंडच्या भूमीतील पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना (West Indies First Win In New Zealand) विजय आहे. तसेच वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला विश्वचषकात पराभूत करण्याची ही दुसरीच वेळ आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी आला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर २५९ धावा जोडल्या होत्या. यात सलामीवीर हिले मॅथ्यूस हिच्या शतकी खेळीचा मोठा वाटा राहिला. तिने न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना चिवट खेळी केली. १२८ चेंडूंमध्ये १ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने तिने ११९ धावा चोपल्या. तिच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला मोठ्या धावा करता आल्या नाहीत.

न्यूझीलंडकडून गोलंदाज ली तहूहू हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर जेस केरनेही तिच्यापाठोपाठ २ विकेट्स काढल्या.

वेस्ट इंडिजच्या २६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २५६ धावांवरच गारद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिवाइन हिने १०८ धावांची शानदार शतकी खेळी केली. १० चौकारांच्या मदतीने तिने या धावा फटकावल्या. तसेच यष्टीरक्षक कॅफे मार्टिन हिनेही खालच्या फळीत ४४ धावांची आक्रमक खेळी केली. परंतु वेस्ट इंडिजच्या सांघिक कामगिरीपुढे न्यूझीलंडचा टिकाव लागला नाही. वेस्ट इंडिजच्या हिली मॅथ्यूस, अनिसा मोहम्मद आणि डेंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

परिणामी वेस्ट इंडिजने ३ धावांनी हा सामना जिंकत न्यूझीलंडच्या धरतीवरील आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना विजय नोंदवला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला आहे. परंतु त्यांना आजवर एकदाही सामना जिंकण्यात मात्र यश आले नव्हते. याआधी वेस्ट इंडिजने न्यूझीलंडमध्ये १४ सामने खेळले आहेत, परंतु त्यातील १४ ही सामने गमावले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने ३८ वी धाव करताच नावावर झाला मोठा विक्रम; यापूर्वी केवळ ५ भारतीयांनी केलाय कारनामा

रिकी पाँटिंगनंतर बरेच खेळाडू १०० कसोटी खेळले, पण ‘तो’ पराक्रम एकट्या विराट कोहलीलाच जमला

मोठी बातमी! १०० व्या कसोटीतही विराट शतक करण्यात अपयशी, अवघ्या ‘इतक्या’ धावांवर क्लीन बोल्ड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---