भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर टी२० मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी असेल. तर वेस्ट इंडिजचा संघ मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील असेल. तत्पूर्वी उभय संघांमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक झाली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पोलार्डचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आहे.
तसेच दोन्ही संघांनी त्यांची अंतिम एकादश जाहीर केली असून भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. तर वेस्ट इंडिज संघात एक बदल असून जेसन होल्डरचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे फॅबियन ऍलनला बाकावर बसावे लागले आहे.
Toss news from Eden Gardens 👇
West Indies have opted to bowl in the second #INDvWI T20I. pic.twitter.com/tLVJ31O1Ip
— ICC (@ICC) February 18, 2022
भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल
वेस्ट इंडिजचा संघ:
ब्रेंडन किंग, कायले मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, शेल्डन कॉट्रेल
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डही करणार शतक? कसं ते घ्या जाणून