भारतीय क्रिकेटचा नवा देशांतर्गत हंगाम सुरू झाला आहे. हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना 13 जुलैपासून बंगलोर येथे खेळला जाईल. त्यानंतर याच विभागांवर होणारी वनडे स्पर्धा म्हणजे देवधर ट्रॉफी खेळली जाईल. चार वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर ही स्पर्धा खेळली जाणार आहे. अशात आता या स्पर्धेसाठी उत्तर विभाग व पश्चिम विभागाने आपले संघ जाहीर केले असून, यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले अनेक खेळाडू दिसून येतील.
पॉंडिचेरी येथे 24 जुलैपासून ही स्पर्धा होणार आहे. 2019 मध्ये अखेरच्या वेळी ही स्पर्धा आयोजित केली गेलेली. त्यानंतर दोन वर्ष कोविड व त्यानंतर व्यस्त वेळापत्रकामुळे ही स्पर्धा झाली नाही. यावेळी मात्र बीसीसीआयने देशांतर्गत हंगामात या स्पर्धेचा समावेश केला होत. यावेळी ही स्पर्धा सहा संघांमध्ये खेळली जाईल.
भारतीय उत्तर विभागाचे नेतृत्व या स्पर्धेत भारतीय संघासाठी खेळलेला नितीश राणा करेल.वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्याने त्याने आपली निराशा व्यक्त केली होती. त्याच्या व्यतिरिक्त भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या मनदीप सिंग, ऋषी धवनव मयंक मार्कंडे यांना संघात स्थान मिळाले आहे.
दुसरीकडे, दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात प्रवेश केलेल्या पश्चिम विभागाच्या संघात देखील अनेक मोठी नावे आहेत. प्रियांक पांचाल नेतृत्व करत असलेल्या या संघात पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, सरफराज खान व तुषार देशपांडे हे खेळाडू दिसून येतील.
उत्तर विभाग संघ: नितीश राणा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह, एसजी रोहिल्ला, शुभम खजूरिया, मनदीप सिंह, हिमांशु राणा, विवरांत शर्मा, निशांत सिंधू, ऋषी धवन, युद्धवीर सिंह, संदीप शर्मा, हर्षित राणा, वैभव अरोडा आणि मयंक मार्कंडे.
पश्चिम विभाग संघ- प्रियांक पांचाल, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, हार्विक देसाई, हेत पटेल, सरफराज खान, समर्थ व्यास, शिवम दुबे, अतित सेठ, पार्थ भुत, शम्स मुलाणी, अरझान नागवासवाला, चिंतन गजा, राजवर्धन हंगरगेकर.
(West Zone And North Zone Sqaud Announced For Deodhar Trophy Dube Bawne Hangargekar In Team)
महत्वाच्या बातम्या-
नाईट रायडर्सचे नेतृत्व नरीनच्या हाती! अमेरिकेत उडणार टी20 क्रिकेटचा धुरळा, ‘हे’ दिग्गज ही साथीला
पाकिस्तानला नडणार अतिशहाणपणा! ‘या’ संघाला वर्ल्डकपमध्ये प्रवेश देण्याची आयसीसीची तयारी