सध्या एकदिवसीय चषक (One Day Cup) खेळला जात आहे. त्यामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Western Australia) संघाने तस्मानियाविरूद्ध केवळ एका धावात 8 विकेट्स गमावल्या. ती एक धावही वाईड बाॅल पडल्यामुळे आली. अशाप्रकारे ऐतिहासिक विकेट्स पडल्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय चषक बचावाचे स्वप्नही धोक्यात आल्याचे दिसत आहे.
वाका मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ 20.1 मध्ये केवळ 53 धावा करून सर्वबाद झाला. तस्मानियासाठी, बो वेबस्टरने त्याच्या 6 षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावांत 6 विकेट्स घेतल्या, तर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 16 षटकात 52 धावात केवळ 2 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर जे घडले ते ऐतिहासिक होते. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 28 चेंडूत 8 विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलिया 2 बाद 52 धावा आणि त्यानंतर 53 धावांवर सर्वबाद झाला. त्यामध्ये 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 क्रमांकाच्या फलंदाजांपैकी एकही फलंदाज धावा करू शकला नाही.
एकदिवसीय चषकाच्या (One Day Cup) इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. 2003 मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया संघ होबार्टमध्ये तस्मानियाविरूद्ध 51 धावा करून सर्वबाद झाला होता. तस्मानियाने हे लक्ष्य केवळ 8.3 षटकांत पूर्ण केले आणि 7 गडी राखून विजय शानदार मिळवला होता.
सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा (Western Australia) प्रयत्न आता धोक्यात आला आहे. 1 विजय आणि 3 पराभवांसह ऑस्ट्रेलियाला त्यांच्या उर्वरित 3 सामन्यांमध्ये व्हिक्टोरिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडचा पराभव करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावू शकतो भारतीय संघ?
वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
काल सुंदर, आज मिचेल सँटनर; पुण्याचा मैदानावर किवी गोलंदाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी