जेव्हाही भारतीय संघ एखादी मोठी कामगिरी करतो, तेव्हा मैदानात उपस्थित प्रेक्षक ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा जयघोष करताना दिसतात. आताही असंच काहीसं झालं आहे. मंगळवारी (दि. 04 जुलै) सॅफ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध कुवेत संघात बंगळुरू येथे पार पडला. या सामन्यात सुनील छेत्री याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेत संघाला 5-4ने पराभवाचा धक्का दिला. सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद उंचावताच स्टेडिअममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी एकसुरात वंदे मातरम गीत गायलं.
भारतीय प्रेक्षकांना वंदे मातरम (Vande Mataram) गीत गाताना पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तसेच, नेटकरी भारतीय संघ सॅफ चॅम्पियनशिप 2023चा किताब जिंकल्यामुळे भलतेच आनंदात आहेत.
The Bengaluru crowd singing ‘Vande Mataram’ after India became SAFF Champions. pic.twitter.com/uufTHpciqO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2023
खरं तर, निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. त्यानंतर सामन्यात अधिक वेळ मिळाला. मात्र, अधिक वेळेतही दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारतीय संघाला यश आले. अशाप्रकारे भारताने 9व्यांदा सॅफ चॅम्पियनशिप आपल्या नावावर केला.
कुवेतच्या खेळाडूने केला अंतिम सामन्यातील पहिला गोल
या सामन्यातील पहिला गोल कुवेतचा खेळाडू अलकल्डी याने केला. अशाप्रकारे सामन्याच्या 16व्या मिनिटाला कुवेत संघाने 1-0ने आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघाला 17व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, ही संधी भारताने गमावली. यानंतर 39व्या मिनिटात भारतीय कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने गोल केला. अशाप्रकारे भारताने सामन्यात बरोबरी केली.
???????????????????????????????????? ???????????????? ???????????????????? ????????????????????????????????????
An unbeaten @IndianFootball clinch their 9th SAFF Championship! ????????????#India #Kuwait #KUWIND #SAFFChampionship2023 #BlueTigers #BackTheBlue #IndianFootball pic.twitter.com/H0fQlQ8i1f
— Indian Super League (@IndSuperLeague) July 4, 2023
पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला सामन्याचा निकाल
भारत विरुद्ध कुवेत संघातील सामना निश्चित वेळेत 1-1च्या बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्यात अतिरिक्त वेळ मिळाला. मात्र, दोन्ही संघाचे खेळाडू गोल करू शकले नाहीत. त्यानंतर सामना निकाली काढण्यासाठी पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतला 5-4ने पराभूत केले. भारताकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये महेश सिंग, सुभाशीष बोस, लालियानजुआला चांगटे, संदेश झिंगन आणि सुनील छेत्री यांनी गोल केला. अशाप्रकारे, छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. (what a moment The Bengaluru crowd singing ‘Vande Mataram’ after India became SAFF Champions)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: ब्लू टायगर्सने नवव्यांदा उंचावला सॅफ कप! सडन डेथमध्ये कुवेतवर केली मात
दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत बीकेबी युनायटेड संघाची विजयी सलामी