---Advertisement---

घरेलु मैदानावर आरसीबीच्या तिसऱ्या पराभवाचं नेमकं कारण काय, कर्णधार काय म्हणाला?

---Advertisement---

आयपीएल 2015 स्पर्धेतील 34 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात पावसाने अडचण आणल्याने सामन्याला उशिराने सुरुवात झाली. सामन्याची वेळ निघून गेल्याने हा सामना 20 षटकांऐवजी 14-14 षटकांत खेळण्यात आला. घरच्या मैदानावर खेळताना पुन्हा एकदा आरसीबी संघाची
वाईट अवस्था पाहायला मिळाली. या सामन्यात पंजाबने 5 विकेट्सने विजय मिळवला.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 5 खेळाडू राखून पराभवाचा सामना करावा लागला. यासह या संघाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएल स्पर्धेत घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत आरसीबी संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. या संघाने आतापर्यंत घरच्या मैदानावर खेळताना 46 सामने गमावले आहेत. यासह या संघाने या लाजिरवाण्या विक्रमात दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकलं आहे. यापूर्वी घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम हा दिल्लीच्या नावावर होता. दिल्लीने 45 सामने गमावले आहेत.

पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना रजत पाटीदार म्हणाला, फंलदाजी युनिट म्हणून आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. भागीदारी करणं महत्त्वाचं होतं, पण आमच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या.

संघातील गोलंदाजांचं कौतुक करताना तो म्हणाला की, खेळपट्टी कशीही असली तरी, आम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल आणि मोठी धावसंख्या करावी लागेल. आमच्या संघातील गोलंदाज खूप चांगली कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. पण, या सामन्यात फलंदाजांनी जिद्दीने फलंदाजी केली, ही देखील चांगली बाब आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघाला 14 षटकांअखेर 9 खेळाडू बाद 95 धावा करता आल्या. नंतर धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने 12.1 षटकात आव्हान पूर्ण केलं.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---