---Advertisement---

IND vs ENG: टीम इंडियाची हेडिंग्लेतील कसोटी कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घ्या हेड टू हेड आकडे.!

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी प्रतीक्षेत आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व यावेळी युवा खेळाडू कर्णधार शुबमन गिलकडे (Shubman gill) सोपवण्यात आलं आहे. टीम इंडियाचे हेच धोरण असेल की, पहिल्या सामन्यात सामना जिंकून 1-0 ने आघाडी घ्यावी. पहिला सामना हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे. जाणून घ्या या मैदानावर टीम इंडियाचं रेकॉर्ड कसे राहिलेल आहे.

हेडिंग्लेमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाने त्यांचा पहिला सामना 1952 मध्ये खेळला होता. या सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. भारताने आतापर्यंत या मैदानावर 7 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान दोन वेळा टीम इंडियाला विजय मिळाला आहे. तसेच एकदा सामना ड्रॉ झाला आहे आणि 4 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. शेवटच्या वेळेस टीम इंडियाने या मैदानावर सामना विराट कोहलीच्या नेतृत्वात 2021 मध्ये खेळला होता. पण तिथेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 20 जून 2025 रोजी भारतीय संघ या मैदानावर त्यांचा आठवा सामना खेळणार आहे.

या मैदानावर आतापर्यंत 84 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 29 सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तसेच 36 सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---