---Advertisement---

द्रविड-शनाकाची गाठभेट ठरलेली सर्वांच्या आकर्षणाचा विषय, पण त्यांच्यात काय झालं बोलणं? वाचा

On: मंगळवार, जुलै 27, 2021 4:15 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात पार पडलेली ३ सामन्यांची वनडे मालिका पाहुण्यांनी २-१ ने आपल्या नावावर केली होती. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला होता. यजमानांनी दमदार प्रदर्शन ३ विकेट्सने हा सामना जिंकत क्लिन स्वीपपासून स्वतचा बचाव केला होता. या सामन्यादरम्यान बऱ्याचशा अशा घटना घडल्या, ज्यांनी सामना दर्शकांचे लक्ष वेधले. त्यातीलच एक घटना, भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका यांच्यात मैदानावर झालेला संवाद.

द्रविड आणि शनाकाचे एकमेकांना बोलतानाचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरले होते. प्रतिस्पर्धी संघातील या सदस्यांमध्ये नक्की कोणत्या विषयावर बोलणे झाले असावे, यावरुन क्रिकेटप्रेमींनी बरेचसे तर्कवितर्क लावले होते. आता स्वत कर्णधार शनाकाने याबाबत उलगडा केला आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना पाऊस आला होता. यावेळी द्रविड आणि शनाका एकमेकांशी चर्चा करताना दिसले होते.

‘द मॉर्निंग आय के’शी बोलताना शनाका म्हणाला की, “द्रविड सरांनी माझ्यावर स्तुतीसुमने उधळली होती. ते मला म्हणाले होते की, तू अतिशय उत्कृष्टरित्या संघाचे नेतृत्त्व करत आहेस. तुमचा पूर्ण संघ कौतुकास पात्र आहे. तुम्ही तुमच्या प्रदर्शनात फार वेगाने सुधारणा केली आहे. प्रत्येक सामन्यानंतर तुमच्या प्रदर्शनाचा स्तर आणखीणच उंचावत गेला. अगदी दुसऱ्या वनडेतही शेवटपर्यंत चिवट झुंज दिल्यानंतर आम्ही तुमचा पराभव करू शकलो.” 

तसे तर, द्रविड हे उदार व्यक्तीमत्त्व असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. ते नेहमीच आपल्याकडील ज्ञान दुसऱ्यांना देण्याच्या प्रयत्नात देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच इशान किशन, पृथ्वी शॉ, दिपक चाहर अशा बऱ्याचशा युवा क्रिकेटपटूंची कारकिर्द घडली आहे. १९ वर्षांखालील भारतीय संघाला प्रशिक्षण देणाऱ्या द्रविड यांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने पहिलीवहिली वनडे मालिकाही जिंकली आहे.

यानंतर आता श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना जिंकत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दुसरा टी२० सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार होता. परंतु अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. २८ जुलै रोजी हा सामना होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भज्जी’ची पत्नी गीता बसरानं दाखवली मुलाची पहिली झलक; नाव काय ठेवलंय माहितीये?

गोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, ‘हुश्श, थोडक्यात वाचलो’!

‘नेहमी मोठ्या भावाच्या चरणात’, म्हणत रणवीर सिंगने केला माहीसोबतचा फोटो शेअर; जिंकली लाखो मने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---