आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत खूप रोमांचक राहिला आहे. शेवटच्या साखळीफेरी सामन्यांतर प्लेऑफच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं. साखळी फेरीतील अंतिम सामना 19 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार होता. मात्र गुवाहाटीच्या मैदानावर पावसानं व्यत्यय आणल्यानं सामना रद्द करण्यात आला. यामुळे राजस्थान संघाची तिसऱ्या स्थानावरती घसरण झाली. तर सनरायझर्स हैदराबादनं दुसरं स्थानं पटकावलं. पहिल्या स्थानावरती केकेआर तर चौथ्या स्थानावरती आरसीबी आहे.
आयपीएलच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये पावसानं चांगलाच धुमाकुळ घातला. आता प्लेऑफच्या उरलेल्या सामन्यांमध्ये पाऊस राडा घालणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज मंगळवारी (21 मे) क्वालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट नाही. परंतु अचानक पावसानं खोळंबा घातला तर काय होईल? कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल? हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.
क्वालिफायर 1 सामन्यात जर पाऊस आला, तर पंचांवरती किमान 5-5 षटकांचा सामना खेळवण्याची जबाबदारी असेल. परंतु पावसामुळे तेही शक्य नसेल, तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाऊ शकतो. पावसामुळे सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकत नसेल, तर गुणतालिकेच्या आधारे फायनलमध्ये जाणारा संघ ठरवण्यात येईल. कोलकाता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेत शीर्ष स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या स्थानी आहे. पावसाच्या व्यत्ययानं जर सामना झाला नाही, तर श्रेयस अय्यरचा कोलकाता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल.
आयपीएलच्या साखळी सामन्यांनंतर गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरती राहिलेल्या संघांमध्ये क्वालिफायर 1 सामना खेळला जातो. जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचतो. तर हारणाऱ्या संघाला तिसऱ्या आणि चौथ्या संघांमध्ये जो संघ जिंकेल, त्या संघाशी खेळण्याची संधी मिळते. कोलकाता आणि हैदराबाद सामना पावसामुळे रद्द झाला तर कोलकाता फायनल मध्ये पोहचेल. आणि हैदराबाद संघाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी दुसरी संधी मिळेल.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या आरोपांना ‘स्टार स्पोर्ट्स’नं दिलं उत्तर, निवेदन जारी करत म्हणाले…
‘या’ 5 कारणांमुळे ‘थाला’ची टीम आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही; जाणून घ्या






