आजकाल क्रिडाविश्वात सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती गोष्ट म्हणजे सध्या बर्मिंघम येथे सुरू असललेलली राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा २०२२ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स. दररोज आपण याबाबतच्या नवनवीन बातम्या ऐकतो. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे काय?, ती कोण भरवतं? त्यात कोणते देश सहभागी होतात? कोणते खेळ खेळतात? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यांना पडणाऱ्या या प्रश्नांचा घेतलेला माहास्पोर्ट्सने घेतलेला विशेष लेखाजोखा…
राष्ट्रकुल आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांमध्ये होणारी एक क्रीडा स्पर्धा आहे. ज्या देशांवर ब्रिटीशांनी राजय गावलं प्रामुख्याने तेच देश या स्पर्धेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत असते. १९३० सालापासून दर चार वर्षांनी ही स्पर्धा भरवली जाते. सुरुवातीला ब्रिटिश एम्पायर क्रीडा स्पर्धा, नंतर १९५४ सालापासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल स्पर्धा नंतर १९७० सालापासून ब्रिटिश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या नावांनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली या स्पर्धेला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं नाव देण्यात आलं.
कोण भरवतं ही स्पर्धा?
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करते. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक खेळांबरोबरच इतर काही विशेष खेळ खेळले जातात. एकूण ५४ देश राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य असले तरीही क्रीडा स्पर्धेत मात्र एकुण ७१ देश भाग घेतात. युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड व वेल्स हे घटक देश स्वत:चे वेगळे संघ इथे पाठवतात.
किती खेळांचा समावेश?
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२मध्ये एकूण २७ क्रीडा प्रकारांचा (उपप्रकारांसह) समावेश होतो. यात प्रामुख्याने जलक्रीडा, तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध (बॉक्सिंग), सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बोलिंग, नेटबॉल, रग्बी सेव्हन्स, स्क्वॉश, टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल हे क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत. याशिवाय यंदाच्या वर्षीपपासून महिला क्रिकेटचे सामनेही आपलल्याला कॉमनवेल्थमध्ये पाहायला मिळत आहेत.
कुठे रंगतेय स्पर्धा?
राष्ट्रकुल २०२२ ही स्पर्धा गेल्या २८ जुलै २०२२ पासून इंग्लंडमध्ये स्थित असललेल्या बर्मिंघम येथे सुरू झाली आहे. ८ ऑगस्ट २०२२ रोजी यास्पर्धेची दिमाखदार सांगता होणार आहे. आत्तापर्यंत (१ ऑगस्ट) भारताने या स्पर्धेत एकुण ६ पदके मिळवली आाहेत. ज्यामध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य आमि १ कांस्य पदकाचा समावेश आहे. याशिवाय पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळवल्या जात असललेल्या महिला क्रिकेटमध्ये टीम इंडिया अ गटात ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय संघाचे उपांत्या फेरीतील स्थान जवळलपास निश्चित झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतासाठी तिसऱ्या खेळाडूने रचली ‘सुवर्ण’गाथा, जिंकले कॉमनवेल्थ २०२२ मधील सहावे पदक
‘…म्हणून रसल आता फक्त केकेआरसाठीच खेळणार’, खुद्द सीईओंनी केलं स्पष्ट
महाराष्ट्र क्रिकेटसाठी दुःखद बातमी! माजी दिग्गज क्रिकेटपटूला देवाज्ञा