इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच रोमांचक झाली. ऍशेस 2023चा हा दुसरा सामना असून ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात 43 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी मैदानावर एक वादग्रस्त घटना घडली. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो हा धावबाद झाला. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने खिलाडूवृत्ती न दाखवता त्याला बाद केल्याचा आरोप होत आहे. मात्र हा नियम नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया.
कॅमेरून ग्रीन याने पहिल्या सत्राच्या समाप्तीच्या काही आधीचे षटक टाकताना अखेरचा चेंडू बाऊन्सर टाकला. फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टो याने तो चेंडू सोडला आणि पुढे चालू लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याने चेंडू हातात आल्यानंतर थेट यष्ट्यांवर फेकला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले व काहीसा पुढे आलेला जॉनी बाद ठरला.
यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी तसेच अनेक माजी खेळाडूंनी या संपूर्ण प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन संघावर टीका केली. त्यांनी अखिलाडूवृत्ती दाखवण्याचे म्हटले गेले. मात्र, नियम पाहायचं झाल्यास दिसून येते की एमसीसीच्या 20.2.1 नियमानुसार, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ व प्रमुख पंच इशारा करत नाही तोपर्यंत चेंडू खेळाचा भाग असतो. या प्रकरणातही पंचांनी चेंडू झाल्याचा आवश्यक समाप्त झाल्याचा इशारा केला नव्हता. त्यामुळे ही सर्वस्वी चूक बेअरस्टो याची असल्याचे दिसून येते. सामन्यानंतर बोलताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने देखील आपला फलंदाज बाद असल्याचे कबूल केलेले.
(What Is Dead Ball Rule In MCC Rule Book Johnny Bairstow Run Out Scene)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर मराठा वॉरियर्स आघाडीवर
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक






