भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) 2023चे पहिले चर्चासत्र रविवारी (1 जानेवारी) मुंबईमध्ये पार पडले. यामध्ये भारताच्या वरिष्ठ संघाचे कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण, निवडकर्ते चेतन शर्मा, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिन जय शहा हे उपस्थित होते. या बैठकीत भारताच्या 2022 मधील प्रदर्शनाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर 2023चा रोड मॅप म्हणजे तयारी स्पष्ट केली गेली. तसेच खेळाडूंना निवडीसाठी यो-यो टेस्ट आणि डेक्सा टेस्ट या चाचण्या पार कराव्याच लागतील हे मोठे निर्णय घेण्यात आले. यामधील डेक्सा टेस्ट म्हणजे काय ते जाणून घेऊ.
आतापर्यंत भारतीय संघात प्रवेशासाठी केवळ यो-यो टेस्ट पास करावी लागायची, मात्र मागील हंगामात अनेक खेळाडू मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे खेळाडूंच्या प्रवेशासाठी आणखी एका चाचणीची भर टाकण्यात आली आहे.
डेक्सा टेस्ट म्हणजे काय?
खेळाडूंसाठी, डेक्सा चाचणी मुळात त्यांची दुखापत, शरीरातील फॅटचे प्रमाण आणि हाडांची ताकद तपासते. यामध्ये शरीरातील हाडांची तपासणी (Measuring bone density) करून एक विशेष प्रकारचा एक्स-रे काढला जातो. यामुळे 10 मिनिटांच्या या चाचणीमध्ये खेळाडू किती तंदुरुस्त आहे, हे कळते.
यो-यो टेस्ट
ही चाचणी खेळाडूंच्या फिटनेसबाबत आहे. यामध्ये एकूण 23 स्तर असतात. भारतीय खेळाडू 5व्या स्तरापासून त्याची सुरूवात करतात. यामध्ये खेळाडूंना 40 मीटरचे अंतर ठरवून दिलेल्या वेळेत पार करायचे असते. जसजसे स्तर वाढतो तसतसे मीटर वाढत जातात आणि वेळ कमी होत जातो. यावेळी एका सॉफ्टवेयरची मदत घेतली जाते.
भारतीय संघात सध्या उपस्थित असलेल्या खेळाडूंच्या यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी 16.1 आहे. त्यामध्ये विराट कोहली(Virat Kohli), हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रविंद्र जडेजा यांचे अधिक गुण आहेत.
बीसीसीआयच्या चर्चासत्रात आयपीएल 2023मध्ये काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. यासाठी एनसीए आणि आयपीएल फ्रॅंचायजी मिळून काम करतील हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. जो वनडे विश्वचषकासमोर ठेवून घेतला गेला. भारत 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यामध्ये भारताचे नेतृत्व हार्दिककडे आहे.
(What is DEXA test? Indian players have to pass this test to join the team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथनचा मुख्य फेरीत प्रवेश
वाढदिवस विशेष: भारत-आयर्लंडकडून क्रिकेट खेळणारे रमन लांबा, बांगलादेशातही मिळालं प्रेम