गुरुवारी (१८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेला चौथा टी२० सामना भारताने ८ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. भारताचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव या अटीतटीच्या सामन्याचा नायक ठरला. मात्र त्याच्या झंझावती खेळीला अनपेक्षित ब्रेक लागल्याने वाद निर्माण झाला आहे. पंचांच्या सॉफ्ट सिग्नलमुळे या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे पंचांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल म्हणजे नक्की काय? याचे नियम काय आहेत? असे प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाले आहेत.
सूर्यकुमार यादव ‘असा’ झाला बाद
त्याचे झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सूर्यकुमार १४ व्या षटकात ५७ धावांवर खेळत होता. हे षटक सॅम करन टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमारने फाईन लेगवरुन मोठा फटका मारला. पण तिथे असणाऱ्या डेविड मलानने तो चेंडू चपळाईन झेलला.
मात्र त्याने चेंडू झेलल्यानंतर तो चेंडू जमीनीला टेकला की नाही हे तिसऱ्या पंचांकडून तपासण्यात आले. मात्र तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या बाजूंनी चेंडू जमीनीला लागला की नाही हे पाहिल्यानंतरही संभ्रम कायम राहिला. त्यामुळे अखेर मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल बाद दिलेला असल्याने सूर्यकुमारला विकेट गमवावी लागली.
Surya Kumar yadav was never out.
Idiots…#INDvsENG_2021 #T20I #suryakumaryadav pic.twitter.com/R2EDpbJTEL
— तुषार उप्रेती (@tusharupreti123) March 18, 2021
सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय
जेव्हा सामना पंच एखाद्या निर्णयावर ठाम नसतात, त्यावेळी ते तिसऱ्या पंचांची मदत घेतात. परंतु मदत घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो, त्यालाच ‘सॉफ्ट सिग्नल’ असे म्हणतात. हा सिग्नल बाद किंवा नाबादचा असतो. पुढे पडताळणीनंतर जर तिसरे पंचही आपल्या निर्णयाबद्दल १०० टक्के खात्रीशीर नसतील; तर ते सामना पंचांनी दिलेल्या सॉफ्ट सिग्नलवर आपला पुढील निर्णय घेतात. अशावेळी सामना पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.
टू डायमेंशनल टीव्ही कॅमेरामध्ये व्हिज्युअल्स स्पष्ट दिसत नसत. याचमुळे बहुदा तिसरे पंच फलंदाजाला नाबाद द्यायचे. त्यामुळे क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नलचा नियम आणला गेला. सॉफ्ट सिग्नलमध्ये अनेक वेळा फलंदाजांना कारण नसताना तंबूत परतावे लागत आहे. म्हणून सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव आणण्याच्या विचार सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या कॅप्टन्सीची कमाल! शेवटच्या ४ षटकात घेतले धाडसी निर्णय अन् ‘असा’ फिरवला सामना
शार्दुल विरुद्ध खेळताना आर्चरची तुटली बॅट अन् ‘ते’ ट्विट झालं व्हायरल