आयसीसी वनडे विश्वचषक 2023च्या वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) झाली. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात यजमानपदाची भूमिका पार पाडणार असून स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. यावर्षीचा विश्वचषक राउंड राउंड रॉबिन पद्धतीने खेळला जाणार, असे सांगितले गेले आहे. मात्र, अनेकांना ही राउंड रॉबिन पद्धथ काय आहे, हेच माहीत नाही. चला तर जाणून घेऊ राउंट रॉबिनविषयी.
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा विश्वचषक स्पर्धा राउंड रॉबिन (Round Robin) पद्धतीने आयोजित केली गेली आहे. यापूर्वी 1992 आणि 2019 मध्येही राउंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक स्पर्धा आयोजित केली गेली होती. 2023 विश्वचषक (World Cup 2023) देखील याच पद्धतीचा आहे. राउंड रॉबिन म्हणजे स्पर्धेत सहभाग घेणारे सर्व संघ एकमेकांसोबत लीग स्टेजचा एक-एक सामना खेळतील. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 9-9 सामने खेळेल. लीग स्टेजमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील.
विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यांमध्ये गुणतालिकेतील पहिला विरुद्ध चौथा आणि दुसरा विरुद्ध तिसरा असे सामने आयोजित केले जातील. या दोन सामन्यांच्या निकालानंतर अंतिम सामन्याचे संघ निश्चित होतील. अशा पद्धतीच्या आयोजनालाच राउंड रॉबिन असे म्हणतात. यात संघांचे दोन ग्रुप पाढून सामने आयोजित केले जात नाहीत. यामुळे पहिल्या चारमध्ये जागा पक्की करण्यासाठी संघाला आपल्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाशी खेळून पुढे जावे लागते.
राउंड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन काही खास नव्हते. 1992मध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने विश्वचषक खेळला गेला, तेव्हा भारताला उपंत्य फेरीतही जागा मिळवता आली नव्हती. त्यानंतर 2019 विश्वचषकात देखील भारताला समाधआनकारक कामगिरी करता आली नाही. यावेळी संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला, पण पुढे जाऊ शकला नाही. (What is the round robin system used in ODI World Cup 2023?)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: सपना गिल प्रकरणात पृथ्वीला क्लीनचीट! मुंबई पोलिसांचा जबाब ठरला निर्णायक
MPL 2023: पुणेरी बाप्पा की ईगल नाशिक टायटन्स? कोण ठरणार क्वालिफायर 2 साठी पात्र?