आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या लखनऊ फ्रेंचायझीच्या मेंटॉरपदी भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (GAUTAM GAMBHIR) याची नियुक्ती केली गेली आहे. गंभीर सध्या लखनऊ फ्रेंचायझीचा प्रमुख चेहरा देखील बनला आहे. फेब्रुवारी महिन्यात बीसीसीआयने आयपीएलच्या मेगा लिलावाचे आयोजन केले आहे. गंभीरच्या मते, लखनऊ फ्रेंचायझीकडे मेगा लिलावात स्वतःची ओळख तयार करण्याची संधी आहे, जे याआधी कधीच झाले नाही.
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये होईल. पत्रकार बोरिया मजूमदारच्या बॅकस्टेज विथ बोरिया कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, “मला वाटते की, ही ओळख बनवण्याची आणि असे काहीतरी करण्याची चांगली संधी आहे, जे आधी कधीच झाले नाहीये. आम्हाला कोणाची नक्कल करायची नाही. आपल्याला स्वतःची छाप सोडण्याची गरज आहे.”
लखनऊ सुपर जायंट्स संघाला संजीव गोयंका समूहाने मोठ्या किमतीत विकत घेतले आहे. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघ त्यांच्याच मालकीचा होता. २०१७ मध्ये पुणे संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, पण एक धाव कमी पडल्यामुळे संघाला पराभव पत्करावा लागलेला. गंभीरच्या मते आता जूना व्यवहार पूर्ण करण्याची वेळ आहे.
“संजीव सरांकडे जेव्हा पुणे फ्रेंचायझी होती, ते एक धाव कमी पडल्यामुळे जेतेपद जिंकू शकले नव्हते. त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे एक मोठे आव्हान असेल. परंतु, मग आम्ही असे आश्वासन देऊ शकत नाही की, ते एका वर्षात होणार आहे. यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे आम्ही फक्त एक वर्षाचा विचार करून पुढे नाही चाललो,” असे गंभीर पुढे बोलताना म्हणाला.
कर्णधाराच्या रूपातील कामगिरी चांगली राहिली, पण मेंटॉरची भूमिका पाहावी लागणार
दरम्यान, आयपीएलच्या इतिहाताली सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गंभीरचे नाव येते. आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन असे कर्णधार होऊन गेले आहेत, ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळा स्पर्धा जिंकली आहे. यामध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर येतो, ज्याने मुंबई इंडियन्सला ५ आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे, ज्याने चेन्नई सुपर किंग्जला चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. गंभीर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्स संघ दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकला आहे. आता लखनऊ फ्रेंचायझीच्या मेंटॉरच्या भूमिकेत गंभीर काय कामगिरी करतो, हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
नेदरलॅंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजाचा २९ व्या वर्षी क्रिकेटला रामराम; ट्विटरवरून केली घोषणा
‘सुपर सब’ नासिरीची हॅट्ट्रिक! ‘कोलकाता डर्बी’मध्ये मोहन बागानची सरशी
“आमच्या कमाईचा हा एकमेव मार्ग”; रणजी ट्रॉफी विजेत्या कर्णधाराने सांगितले विदारक सत्य
व्हिडिओ पाहा –