बझबॉल हे नाव इंग्लंडच्या कसोटी संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर पडले आहे. ज्याचा अर्थ, कसोटी क्रिकेटमध्ये देखील वेगाने धावा करण्याचा आक्रमक अंदाज आजमावणे असा आहे. ‘बझबॉल’ ला सामना ड्रॉ करण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी बनवले गेले आहे. मॅक्युलम यांचे टोपननाव ‘बाझ’ असल्याने त्यावरून हा शब्द पडला आहे. याच रणनितीचा वापर करून इंग्लंडने भारताविरुद्ध ७६.४ षटकांत ३७८ धावांचा यशस्वी पाठलाग करत ७ विकेट्सने पाचवी कसोटी जिंकली आहे.
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी mahasports.in वर जा)