मुंबई। आयपीएलचा 11 वा मोसम आता अखेरच्या टप्यात आली आहे. मंगळवारी, 22 मेला आयपीएल प्ले-आॅफला सुरवात झाली.
प्ले-आॅफमधील क्वालिफायर 1 चा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्याच रंगला. या सामन्यात चेन्नईने २ विकेट्सने विजय मिळवला.
कर्णधार धोनीने ९ आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं असुन तब्बल ७ वेळ चेन्नईला अंतिम फेरीत नेलं आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी कोणत्याही कर्णधाराला करता आलेली नाही. असं असतानाही धोनी आपल्याला कॅप्टन कूल का म्हणतात हे त्याच्या कृतीतुन वेळीवेळी दाखवुन देतो.
कालच्या सामन्यात जेव्हा चेन्नईने हैद्राबादवर विजय मिळवला तेव्हा डगआऊटमध्ये बसलेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. तसेच काही खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. त्यात अनेक अनुभवी खेळाडूंचाही समावेश होता. अगदी कोच स्टिफन फ्लेमिंगनेही जोरदार सेलिब्रेशन केले. परंतु धोनी केवळ टाळ्या वाजवताना दिसला.
एकदा एका समालोचकाने गमतीने म्हटले होते की धोनीच्या चेहऱ्यावरुन तुम्ही कधीच सांगु शकत नाही की तो सामना जिंकला आहे की पराभूत झाला आहे. बऱ्याच वेळा सामना जिंकल्यावर तो शांतच असतो तर पराभूत झाल्यावर तो खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसला आहे. कालही याचा प्रत्यय धोनीच्या तसेच तमाम क्रिकेटप्रेमींना आला.
शेवटचा आणि आयपीएल २०१८चा अंतिम सामना चेन्नई वानखेडेवरच २७मे रोजी खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग
–एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!
–एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम
–कॅप्टन कूल एमएस धोनीचा नाद करायचा नायं !