बांगलादेश संघाने काल ५ विकेट्सने न्युझीलँड संघावर विजय मिळवून २ गुणांची कमाई केली. सध्या बांगलादेशचे एकूण गुण ३ असून ते पॉईंट टेबलमध्ये अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशला या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे परंतु त्यासाठी त्यांना जर-तरच्या गणितावर अवलंबून रहावं लागेल.
आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होत असून अ गटातील हा शेवटचा सामना आहे. ह्या सामन्यातील विजयावर दोन संघाचं भवितव्य अवलंबून आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश
पाहूया काही समीकरणे चॅम्पियन्स ट्रॉफी अ गटातील
#१ जर इंग्लंड जिंकले तर
अ गटात अव्वल असणारा इंग्लंड संघ जर आजचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकला तर अ गटातून इंग्लंडचे ६ गुण होतील आणि गुणांच्या आधारे बांगलादेश उपांत्यफेरीसाठी पात्र ठरेल.
#२ जर ऑस्ट्रेलिया जिंकले तर
जर हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकली तर इंग्लंडचे ४ गुण राहून ऑस्ट्रेलियाचेही ४ गुण होतील आणि हे दोन संघ उपांत्य फेरीला पात्र ठरतील.
#३ जर सामना रद्द झाला तर
जर हा सामना पाऊस किंवा अन्य कारणामुळे रद्द झाला तर याचा मोठा फटका ऑस्ट्रेलिया संघाला बसेल आणि हा संघ स्पर्धेबाहेर फेकला जाईल. याचा फायदा बांगलादेश संघाला होऊन ते उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.