भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली मागच्या काही महिन्यांपासून चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. आशिया चषक 2022 मध्ये विराटने सुमारे तीन वर्षांच्या काळानंतर आंतरारष्ट्रीय शतक केले आणि आता त्याच्या शतकांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. विराटला नेहमीच सचिन तेंडुलकर याच्या 100 शतकांचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानले गेले आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील विराटला सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी दावेदार माले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराटने दोन शतक ठोकले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 74 झाली. वनडे फॉरमॅटमधीले विराटचे हे 46 वे शतक होते. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक करणारा एकमेव फलंदाज असून त्याचा विक्रम मोडणे आजपर्यंत कुणाला जमले नाहीये. पण विराट कोहली (Virat Kohli) हा विक्रम मोडू शकतो, असे सुनील गावसक (Sunil Gavasakar) यांना वाटते. पण यासाठी विराटला वयाच्या चाळिशीपर्यंत खेळले, तर तो सचिनचा विक्रम मोडेल, असे गावसकर म्हणाले. रविवारी (15 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिस्या वनडे सामन्यात विराटने 110 चेंडूत नाबाद 166 धावा कुटल्या.
वादळी खेळीनंतर सर्वत्र विराटचीच चर्चा सुरू आहे. यातच आता गावसकरांची प्रतिक्रिया समोर येत आहे. विराटच्या शतकानंतर गावसकर म्हणाले, “34 वर्षीय विराट सहज 100 आंतरराष्ट्रीय शतके करू शकतो, पण यासाठी त्याला 40 वर्षांपर्यंत खेळावे लागेल. पुढचे पाच किंवा सहा वर्ष तो खेळत राहिला, तर त्याच्या शतकांचा आकडा 100 पर्यंत पोहोचेल. सचिन तेंडुलकर देखील वयाच्या चाळिशीपर्यंत खेळला आणि त्याने स्वतःची फिटनेस कायम राखली. विराटही त्याच्या फिटनेसविषयी जागरूक आहे. तो अजूनही भारतीय संघातील विकेट्समध्ये सर्वात वेगाने धावणारा खेळाडू आहे.”
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचा विचार केला, तर भारताने विक्रमी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतासाठी विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी शतकीय योगदान दिले आणि संघाची धावसंख्या 390 पर्यंत पोहोचवली. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघ मात्र अवघ्या 73 धावा करून सर्वबाद झाला. भारतासाठी मोहम्मद सिराजने 10 षटकात 32 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. परिणामी भारताने तब्बल 317 धावांनी सामना जिंकला. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला. (What will Virat need to do to break Sachin’s record of 100 centuries? Gavaskar told the way)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला सेहवागसारखे स्वातंत्र्य मिळाले नाही, आज मी…’, संधीसाठी झगडणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआयवर निशाणा
ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश