फिफा विश्वचषकाचा 21वा हंगाम रशियामध्ये खेळला गेला. त्या हंगामात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. स्पेन, बेल्जियम, पोर्तुगल, अर्जेंटिना, ब्राझिल यांसारख्या बलाढ्य संघांनी नाहीतर क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक मारली. त्यांना अंतिम फेरीत फ्रांसकडून 4-2 असा पराभव स्विकारावा लागला. तरीही क्रोएशियाच्या यशाचे सर्वत्र कौतुक झाले. याच स्पर्धेत आणखी एक मोठा निकाल लागला, ज्याने एका शहरात थेट भूकंपच आला होता.
सामना होता, मेक्सिको विरूद्ध जर्मनी. झाले असे की, या सामन्यात मेक्सिकोने त्यावेळचा गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जर्मनीला 1-0 ने पराभूत केले.
हिरवींग लोझॅनो (Hirving Lozano) याने केलेल्या या विजयी गोलमुळे मेक्सिको शहरवासीयांनी उड्या मारून जल्लोष साजरा केला होता. यामुळे हा भूंकप आला असे तेथिल भूगर्भ विज्ञान आणि वातावरणीय अन्वेषण विभागाने सांगितले होते. त्यांनी याला ‘कृत्रिम भूंकप’ असेही म्हटले आहे.
हिरवींगने 35व्या मिनीटाला हा गोल केला होता. त्याने केलेल्या गोलनंतर अवघ्या सात सेंकदांनी हा भुकंपाचा धक्का जाणवला. 22वर्षीय हिरवींगचा तो पहिलाच विश्वचषक होता. तसेच मेक्सिकन गोलकिपर गिलर्मो ओकोआने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याचे सगळीकडे कौतुकही झाले.
El #sismo detectado en la Ciudad de México se originó de manera artificial. Posiblemente por saltos masivos durante el Gol de la selección de #México en el mundial. Por lo menos dos sensores dentro de la Ciudad lo detectaron a las 11:32. pic.twitter.com/mACKesab3b
— IIGEA A.C. (@IIGEAac) June 17, 2018
“ही आश्चर्याची गोष्ट आहे”,असे एका स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरने म्हटले होते.
“लोकांच्या या जल्लोषाने मला हा सामना पाहण्याची खूप इच्छा झाली. आधी वाटले होते की जर्मनी आपल्याला चांगलीच हरवेल मात्र झाले उलटेच”, असेही त्यांनी पुढे सांगितले.
Mad to leave that out – the Lozano goal was amazing https://t.co/ttWsTMArQe
— Mike (@MikeDingDong) November 6, 2022
21व्या फिफा विश्वचषकात एकमेकांशी भिडण्याआधी जर्मनी आणि मेक्सिको 12वेळा समोरा-समोर आले होते. त्यामधील 5 सामने जर्मनी आणि 2 सामने मेक्सिकोने जिंकले होते. तर रशियाच्या विश्वचषकात जिंकलेला सामना हा त्यांचा दुसराच विजय होता. When a goal scored in the FIFA World Cup caused an earthquake in Mexico
मेक्सिकोने दोनदा विश्वचषकाचे यजमानपद भुषविले आहे. तर ही त्यांची विश्वचषकात सहभागी होण्याची 15वी वेळ होती. कतारमध्ये होणाऱ्या 22व्या फिफा विश्वचषकातही त्यांचा समावेश असून लोझॅनोची संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत त्यांचा पहिला सामना रॉबर्ट लेवांडोस्कीच्या पोलंडशी आहे. ग्रुप सी मध्ये असणाऱ्या या दोन संघासोबत अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया हे संघदेखील आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या फलंदाजीवर भारताच्या दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न, इंडियाचा उपांत्य फेरीत लाजिरवाणा पराभव
‘डिव्हिलियर्सला टीम इंडियाचा मेंटर बनवा’; भारतीय दिग्गजाने केली मागणी