दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने १९ नोव्हेंबर रोजी अचानक क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती जाहीर करत आपल्या लाखो चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या निर्णयानंतर त्याचे चाहते भरपूर निराश झाल्याचे पाहायला मिळाले. याच डिविलियर्सचे भारताशी खूप जवळचे आणि अनोखे असे नाते राहिले आहे.
आपणा सर्वांना माहिती आहे, भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. पण भारतातील क्रिकेटप्रेमी हे केवळ भारतीय क्रिकेटपटूंचेच नव्हे तर परदेशी क्रिकेटपटूंचे देखील चाहते आहेत. भारतात सर्वाधिक पसंती दर्शवली जाणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एबी डिविलियर्सचाही समावेश होतो. याच डिविलियर्सने स्वत: म्हटले होते की, त्याला भारताकडून खूप प्रेम मिळाले आहे. त्यामुळे त्याचे भारताशी खूप जवळचे नाते आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे डिविलियर्सने त्याची प्रेयसी डेनियलला लग्नासाठी भारतातच प्रपोज केले होते.
जेव्हा डिविलियर्स २३ वर्षांचा होता, तेव्हाच त्याने क्रिकेटजगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. दरम्यान, त्याच्या वडीलांच्या फार्म हाऊसवर त्याची डेनियल स्वर्टसोबत पहिली भेट झाली होती. दोघांचेही आई-वडील एकमेकांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे डिविलियर्सच्या वडीलांच्या फार्म हाऊसवर एका कार्यक्रमादरम्यान त्याने डेनिलयला पहिल्यांदा पाहिले होते. बघताच तो तिच्या प्रेमात पडला होता. पण, डिविलियर्स त्यावेळी इतका घाबरला होता की, त्याला त्याच्या मनातील गोष्ट डेनियलला सांगण्याची किंवा तिचा फोन नंबर मागण्याची देखील हिम्मत झाली नव्हती.
डिविलियर्स त्यावेळी इतका लाजत होता की, त्याने पूर्ण कार्यक्रमात डेनियलला हॅलोव्यतिरिक्त एक शब्दही म्हटला नव्हता. पण, नंतर त्याने त्याच्या आईची मदत घेतली. आपल्या मुलाच्या मनातील भावना समजून घेत, डिविलियर्सची आई डेनियलशी बोलली आणि तिचा फोन नंबरदेखील घेतला.
डिविलियर्सने त्याच्या आत्मचरित्र ‘एबी- द ऑटोबायोग्राफी’मध्ये आपल्या प्रेमकहानीचा खुलासा केला होता. यात डिविलियर्सने सांगितले होते की, त्याने कशाप्रकारे आयपीएल २०१३ सुरु होण्यापुर्वी आपल्या पहिल्या प्रेयसीला म्हणजे डेनियल स्वर्टला आग्रा येथे नेले होते. त्यासाठी त्याने दिल्ली ते आग्रापर्यंत रस्त्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने जगातील सर्वात रोमँटींक ठिकाणांपैकी एक अर्थात ताजमहल येथे डेनियलला लग्नासाठी प्रपोज केले. AB De Villiers Proposed His Girlfriend Danielle At Tajmahal
त्याचवर्षी (२०१३) डिविलियर्स आणि डेनियलने लग्नदेखील केले. लग्नाच्या २ वर्षांनंतर जुलै २०१५ मध्ये त्यांना एक मुलगा आणि जुलै २०१७ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला.
दक्षिण आफ्रिकाचा माजी कर्णधार डिविलियर्सने ११४ कसोटी सामन्यात ८७६५ धावा केल्या आहेत. तर, वनडेत त्याने २२८ सामन्यात ९५७७ धावा आणि टी२०मध्ये ७८ सामन्यात १६७२ धावा केल्या आहेत. शिवाय आयपीएलमध्ये त्याने १५४ सामने खेळत ४३९५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा राजीनामा आणि एबीची निवृत्ती; आरसीबीपुढे उभा राहिला नेतृत्वाचा प्रश्न; हे आहेत दावेदार
एबी डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही आहे अबाधित