---Advertisement---

दोन वेळा असे झाले! हा गोलंदाज गोलंदाजीला आला व मैदानात मधमाश्यांनी धुमाकूळ घातला

On: मंगळवार, जून 23, 2020 5:42 PM
---Advertisement---

मुंबई । क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्या षटकात कोणती घटना घडेल याचा पत्ता नसतो. मैदानातही अशा काही घटना घडतात ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. एका सामन्यात अशी घटना घडली की मैदानावरचे सर्व खेळाडू आणि पंच जमिनीवर झोपी गेले. 

2019 साली झालेल्या विश्वचषकाचतील 35 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात भीतीपोटी सर्व खेळाडू आणि पंच जमिनीवर झोपले होते. या घटनेचे कारणही तसे मजेशीर होते.

सामन्यात श्रीलंका संघाची फलंदाजी सुरू होती. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस याने 48 वे षटक टाकून पूर्ण केले. सामना सुरू असताना अचानक भर मैदानात मधमाशांचा घोळका आला. मधमाशा चावतील या भीतीने खेळाडू जमिनीवर झोपले.

या मधमाशांमुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. मैदानावरचे दृश्य पाहून स्टेडियममधून सर्व दर्शक जोरजोरात हसू लागले. घरोघरी टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या लोकांना मैदानात नेमके काय घडले बराच वेळ समजत नव्हते.

यापूर्वी 4 फेब्रुवारी 2017 साली जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू असताना मधमाशांनी व्यत्यय आणला होता. विशेष म्हणजे त्यावेळी गोलंदाजी ख्रिस मॉरिस हाच करत होता. यावेळी यष्टिरक्षण करणार्‍या डिकॉकच्या हेल्मेटवर भरपूर मधमाश्या बसल्या होत्या.

एकंदरीतच, या मधमाशांना देखील दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना आवडत असावा. त्यामुळेच ते सतत यांच्या सामन्यात ते मैदानावर येत असतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---