भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी शतक झळकावले. त्यात अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांचा समावेश होता. या दोघांच्या धावांच्या जोरावर भारतीय संघाने 390 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताने सामना जिंकल्यानंतर विराटला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरीही रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या या सामन्यात शुबमन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. त्यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय संघाच्या डावात फलंदाजी करताना 23 वर्षीय शुबमन गिल (Shubman Gill) याने 97 चेंडूत 116 धावांची वादळी खेळी केली. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 14 चौकारांचा पाऊस पाडला. मात्र, गिल त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
झालं असं की, शुबमन गिल श्रीलंकेच्या डावात सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी त्याला पाहून स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या समूहाने अचानक ‘सारा…सारा’ ओरडण्यास सुरुवात केली. तसेच, गिलला चिडवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. खरं तर, सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, शुबमन गिल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे एकमेकांना डेट करत आहेत. कारण दोघेही काही दिवसांपूर्वी एकत्र स्पॉट झाले होते.
https://www.instagram.com/reel/CnDtWNXBMOG/?utm_source=ig_embed&ig_rid=c3e2f0b2-b285-41e7-b928-cf44d973290b
माध्यमांतील वृत्तांनुसार, गिलचे नाव ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) याच्याशीही जोडले गेले आहे.
भारतीय संघाने मालिका 3-0ने घातली खिशात
भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर विराट कोहली (नाबाद 166) आणि शुबमन गिल (116) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे 390 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना श्रीलंका संघाच्या नाकी नऊ आल्या. श्रीलंका संघाचा डाव 73 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे भारताने हा सामना 317 धावांनी जिंकला. हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. (when fans started shouting sara sara in front of cricketer shubman gill video goes viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’
सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…