---Advertisement---

इशानने सॉलिड षटकार ठोकत जिंकवला सामना, आनंदात हार्दिकचे डोक्यावर चुंबन; व्हिडिओ तुफान व्हायरल

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 2:52 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाह येथे मंगळवारी (०५ ऑक्टोबर) झालेला सामना रोहित शर्मा आणि पलटणसाठी अविस्मरणीय राहिला. गेल्या काही सामन्यात साजेशे प्रदर्शन न करू शकलेल्या मुंबई संघाने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी करत ८ विकेट्सने सामना खिशात घातला. मुंबई इंडियन्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन या सामन्याचा नायक राहिला. त्याने ताबडतोब अर्धशतक करत संघाच्या विजयात योगदान दिले.

तसेच शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत त्याने संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याच्या प्रदर्शनाला पाहून नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या त्याच्या संघ सहकारी हार्दिक पंड्याने आनंदाने त्याचे कौतुकही केले.

त्याचे झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर केवळ ९० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डॉ कॉकऐवजी इशान किशन सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने डावाअखेर नाबाद राहत २५ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे केवळ ८.२ षटकातच मुंबईला सामना जिंकण्यात यश आले होते.

सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने इशानने हे अर्धशतक झळकावले होते. त्यातही डावातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुस्तफिजुर रेहमानच्या पहिल्या चेंडूवर त्याने जबरदस्त चौकार मारला होता. त्यानंतर संघाला विजयासाठी केवळ २ धावांची आवश्यकता होती. अशावेळी त्याने पुढील चेंडूवर शानदार षटकार खेचला आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या अप्रतिम शॉटला पाहून नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या हार्दिकने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याच्या डोक्याचे चुंबन घेत त्याला शाबासकी दिली.

यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरत असलेल्या इशानला अशाप्रकारे पुनरागमन करताना पाहून डगआऊटमध्ये बसलेला कर्णधार रोहितही संतुष्ट दिसला. त्याने इशानने विजयी षटकार मारल्यानंतर टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले.

सामन्यानंतर इशानने आपल्या फलंदाजीविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “प्रत्येकाच्या कारकिर्दीत चढ-उतार येत असतात. मी सुद्धा या यातून गेलो आहे. पण संघातील वरिष्ठ खेळाडूंनी नेहमी मला प्रोत्साहन दिले आहे. हार्दिक भाई, रोहित भाई यांनी नेहमी मला पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर, विराट कोहलीशीही माझे बोलणे झाले होते. त्यांनीही मला खूप प्रोत्साहित केले आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘मिशन टी२० विश्वचषका’साठी इंग्लंडचा संघ ओमानमध्ये दाखल, ‘या’ तारखेला खेळणार पहिला सामना

पप्पाची परी! सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफला मुलीने शिट्टी वाजवत केले चीयर, पाहा क्यूट व्हिडिओ

लाजिरवाण्या पराभवानंतर निराश झाला संजू; सामन्यानंतर दिली उद्विग्न प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---