पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवणार आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबत साशंकता कायम आहे.
तुम्हाला माहिती आहे का, की भारतीय क्रिकेट संघ शेवटच्या वेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर कधी गेला होता? जरी पाकिस्तानचा क्रिकेट संघ 2023 एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता, परंतु टीम इंडियानं बऱ्याच काळापासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. भारतीय संघ 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये आशिया चषक खेळण्यासाठी शेवटचा पाकिस्तानला गेला होता. त्यानंतर टीम इंडियानं पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.
आशिया कप 2008 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानचा सहज पराभव केला होता. भारताकडून सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं शानदार शतक झळकावलं. यानंतर सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. यावेळी मात्र टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघानं 50 षटकांत 7 गडी गमावून 308 धावा केल्या. भारताकडून महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकी खेळी खेळली. मात्र युनूस खानच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं 4 षटकांपूर्वीच लक्ष्य गाठलं.
2023 चं आशिया चषक पाकिस्तानात होणार होतं. मात्र बीसीसीआयच्या विरोधामुळे पाकिस्तानला यजमानपदापासून वंचित राहावं लागलं. पाकिस्तानकडून यजमानपद हिसकावून घेतल्यानंतर श्रीलंकेनं स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. त्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं पाकिस्तानचा सहज पराभव केला होता. त्यानंतर भारतानं अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून आशिया चषक जिंकला.
हेही वाचा –
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!
भारतीय संघात निवड झाल्यावर राहुल द्रविडचा मुलगा भावूक! म्हणाला…