---Advertisement---

WTC Finalमध्ये टॉवेल गुंडाळून का फिरत होता शमी? दिग्गज गोलंदाजाचा मोठा खुलासा

On: बुधवार, जून 7, 2023 6:41 PM
Mohammad-Shami
---Advertisement---

इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी बलाढ्य भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. बुधवारपासून (दि. 7 जून) खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ किताब मिळवण्यासाठी कडवी झुंज देताना दिसत आहेत. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच आता भारताचा हुकमी एक्का मोहम्मद शमी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अंगावर जर्सी असूनही शमीने टॉवेल गुंडाळल्याचे दिसत आहे. आता यावर शमीने प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद शमीचा जुना व्हिडिओ व्हायरल
आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 पूर्वी मोहम्मद शमी (Mohammad Shami) याचा एक व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत शमीचे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील एक दृश्य दाखवले आहे. यामध्ये सामन्याच्या पाचव्या दिवशी थंडीमुळे शमी जर्सीच्या वर टॉवेल गुंडाळताना दिसत आहे. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओत शमीने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शमीने हा जुना व्हिडिओ पाहून सांगितले की, “त्या सामन्यादरम्यान खूपच थंडी होती. तसेच, माझा स्वेटरही खूप दूर होता. ज्यावेळी मला काही मिळाले नाही, तेव्हा मी पाठ गरम करण्यासाठी टॉवेल गुंडाळला. त्यावेळी मला आशा नव्हती की, मी कॅमेऱ्यात येईल आणि हा व्हिडिओ इतका जास्त व्हायरल होईल.”

https://www.instagram.com/reel/CtJ4uNBLzXa/?utm_source=ig_embed&ig_rid=21344e91-07f3-48ed-825f-1868246c6c21

खरं तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली असून दोन्ही संघ कडवी झुंज देत आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने लंच ब्रेकपर्यंत 23 षटके खेळून 73 धावा चोपल्या होत्या. यावेळी त्यांना 2 विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. त्या विकेट्स उस्मान ख्वाजा (0) आणि डेविड वॉर्नर (43) यांच्या होत्या.

या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा धक्का देऊन दीर्घ काळापासून सुरू असलेला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा वनवास संपवण्याचा प्रयत्न करेल. (when mohammad shami wear towel on the field wtc final see pacers reaction in viral video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! तोंडघशी पडता पडता वाचला रोहित शर्मा; नेटकरीही म्हणाले, ‘…आणि हा भारतीय संघ सांभाळतोय…’
सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---