चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी हा मैदानावर नेहमी शांत असतो. संघातील सर्व खेळाडू जल्लोष साजरा करत असले तरी देखील तो शांतच असतो. अशा शांत स्वभावाच्या एमएस धोनीला रागवताना खूप कमी लोकांनी पाहिलं असेल. एकदा असाच एक किस्सा आयपीएल स्पर्धेत देखील घडला होता. त्यावेळी एमएस धोनी आर अश्विनवर भडकला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने हा किस्सा सांगितला आहे. काय होता तो किस्सा? चला जाणून घेऊया.
आर अश्विन सध्या दिल्ली कॅपिटल्स संघातून खेळत असला तरीदेखील गेली बरीच वर्षे त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा किस्सा २०१४ मध्ये पंजाब विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडला होता.
हा किस्सा सांगत सेहवाग म्हणाला की, “मी देखील त्या सामन्यात खेळत होतो. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलला बाद केल्यानंतर अश्विनने हातात धूळ घेतली आणि ती उडवली होती. जे मलाही आवडले नव्हते. मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. मी असंही नाही म्हटलं की, ही गोष्ट खेळ भावनेच्या विरुद्ध आहे. मात्र धोनी या गोष्टीवरून नाराज झाला होता. त्याने अश्विनला खूप ऐकवले सुद्धा होते.”
अश्विन आणि मॉर्गन यांच्यात झाली होती बाचाबाची
मंगळवारी (२८ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला होता. या सामन्यात रिषभ पंत आणि आर अश्विन फलंदाजी करत असताना एक घटना घडली होती. तर झाले होते असे की, राहुल त्रिपाठीकडे चेंडू गेला असता त्याने थ्रो केला, जो फलंदाजी करत असलेल्या रिषभ पंतच्या शरीराला लागून गेला. त्यावेळी अश्विनने अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्न केला होता. हे पाहून मॉर्गनला राग आला होता. त्याने अश्विनवर खेळ भावनेचे पालन करत नसल्याचा आरोप केला होता. परंतु एमसीसीच्या नियमानुसार चेंडू फलंदाजाच्या शरीराला लागून गेल्यानंतर फलंदाज धाव घेण्यासाठी धावू शकतो.
याबाबत स्पष्टीकरण देताना आर अश्विनने म्हटले की, “मी क्षेत्ररक्षकाचा थ्रो पाहिला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मला माहित नव्हते की, चेंडू रिषभ पंतला लागला आहे. जरी मी पाहिलं असतं तरीदेखील मी पळालो असतो. कारण हे नियमात मान्य आहे. मॉर्गनच्या मते मी नियंमांचे पालन नाही केले परंतु तो चुकीचा आहे.”
अश्विन मॉर्गनमधील याच वादानंतर सेहवागने फिरकीपटू अश्विनसंबंधीच्या या जुन्या किस्स्याची आठवण करुन दिली असावी.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलचा नवा विक्रम! पंजाबसाठी ‘असा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज
MI vs DC, Live: दिल्लीचा नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय, असे आहे ११ जणांचे संघ
जागा एक दावेदार चार! आता रंगणार प्ले ऑफसाठी खरा महासंग्राम; जाणून घ्या सर्व गणिते