आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्स संघाने भारतीय खेळाडूमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना तर विदेशी खेळाडूमध्ये कायरन पोलार्डला याला रिटेन केले होते. असे करताना त्यांनी हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यांना मुक्त केले होते.
मुंबईच्या या निर्णयावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हार्दिकच्या भावनाविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “मुंबईने हार्दिकला रिटेन न करणे ही त्याच्यासाठी आणि सर्वासाठीच आश्चर्याची घटना ठरली.” हार्दिकला वाटले होते की, मुंबई संघ त्याला कायम ठेवतील मात्र तसे काही झाले नाही. त्याने आयपीएलचे पदार्पण मुंबई संघाकडूनच केले होते. त्याने २०१५च्या आयपीएल हंगामातून पदार्पण केले होते. पाच वेळेच्या आयपीएल विजेत्या मुंबई संघाकडून खेळताना अनेक सामन्यांमध्ये त्याने महत्वाची भुमिका बजावली होती.
हार्दिकबाबत असे घडत असताना त्याने हार मानली नाही. त्याला नवख्या गुजरात टायटन्स संघाने विकत घेत संघाचा कर्णधारही केले. त्याने नवीन संघाचे नेतृत्व करताना उत्तम कामगिरी केली. अष्टपैलू असणाऱ्या या खेळाडूने २०२२च्या हंगामातही खऱ्या अष्टपैलू खेळाडूसारखी कामगिरी केली आहे. त्याने संघाला विजेतेपद पटकावुन दिले. तसेच तो संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने १५ सामन्यात ४८७ धावा केल्या होत्या. गोलंदाजीतही पुनरागमन करताना त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध तीन महत्वाच्या विकेट्स घेत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता.
“मुंबईसाठी हार्दिकला जाऊ देणे हा अवघड निर्णय होता. संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), किशन, पंड्या सारखे खेळाडू असताना कोणाकोणाला रिटेन करणार. यामुळे त्यांनी या पाचपैकी तीन खेळाडू निवडले आणि किशनला लिलावामध्ये घेतले,” असे शास्त्री म्हणाले.
“हार्दिकला मुंबईने संघात न घेतल्याने त्याच्यावर दबाव आला होता. अशा परिस्थितीत त्याने उत्तम कर्णधाराची आणि अष्टपैलू खेळाडूची भुमिका अप्रतिमरित्या पार पाडली,” असेही शास्त्रींनी पुढे म्हणत हार्दिकचे कौतुक केले आहे.
हार्दिकने १०७ आयपीएलच्या सामन्यात खेळताना १९६३ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ अर्धशतकांचा समावेश असून त्याने ५० विकेट्सही घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनच्या ‘स्विच हीट’ विधानावर न्यूझीलंडच्या दिग्गजाचे धक्कादायक वक्यव्य; म्हणाला, ‘बॅन करा….’
आफ्रिदीच्या स्विंगने श्रीलंका नेस्तनाबूत! पहिल्या दिवसावर पाकिस्तानचे वर्चस्व
टी२० विश्वचषकानंतर ‘हे’ ३ भारतीय क्रिकेटर घेऊ शकतात निवृत्ती, एकटा राहिलाय सर्वात मोठा मॅच विनर