जेव्हा अश्विनने घेतलेली विकेट पाहून फलंदाजालाच वाटते आश्चर्य, पहा व्हिडिओ

पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(12 ऑक्टोबर) भारताचा फिरकीपटू आऱ अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉकला त्रिफळाचीत करत या सामन्यातील पहिली विकेट घेतली.

पण ज्याप्रकारे डीकॉक त्रिफळाचीत झाला तो चेंडू पाहून डीकॉकही गोंधळात पडला होता. याचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात डीकॉक फलंदाजी करत असताना अश्विनने 38 व्या षटकातील टाकलेला शेवटचा चेंडूने स्टंम्पवरील बेल्स उडवले.

यावेळी बेल्स उडालेले पाहून भारतीय खेळाडूंनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. पण डीकॉकच्या तो बाद झाला आहे हे लक्षात आले नाही. तो त्याची विकेट गेलेली पाहून गोंधळात पडला. अखेर तो बाद झाल्याचे आणि पंचांनीही त्याला तो बाद असल्याचे सांगितल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला.

डीकॉकने 48 चेंडूत 7 चौकारांसह 31 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार फाफ डू प्लेसिसबरोबर सहाव्या विकेटसाठी 75 धावांची खेळी केली.

या सामन्यात आज(12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 275 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने पहिल्या डावात तब्बल 326 धावांची आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कर्णधार फाफ डूप्लेसिसने 64 धावांची तर केशव महाराजने 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच वर्नोन फिलँडरने नाबाद 44 धावा केल्या. भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादवने 3, मोहम्मद शमीने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला आहे.

You might also like