काल प्रो कबड्डीमधील ५०० रेड पॉईंट्स मिळवणारा पहिला खेळाडू बनण्यासाठी तेलगू टायटन्सच्या राहुल चौधरीला फक्त ८ गुणांची गरज होती. परंतु मोठ्या प्रमाणावर रेड मारूनही हा खेळाडू काल अपयशी ठरला आणि विश्वविक्रम होण्यासाठी त्याला या खेळाडूला अजून एक सामना वाट पाहावी लागेल. काय सामन्यात राहुल कसा हा विक्रम करण्यात अयशस्वी ठरला त्याचे हे वार्तांकन….
प्रो कबड्डीमध्ये आज प्रदीप नरवालच्या पाटणा पायरेट्स आणि राहुल चौधरींच्या तेलगू टायटन्सचा सामना चालू असताना राहुल चौधरीला रेडींगमधील ५०० गुण मिळवणारा पहिला रेडर होण्यासाठी फक्त ८ गुण कमी होते. पहिल्या हाफमध्ये राहुलने चमकदार कामगिरी केली पण हाफ संपण्याच्या वेळेला त्याला ५०० हा जादुई एकदा मिळवण्यासाठी फक्त दोन गुण कमी होते पण त्यावेळी मोनू गोयंतने त्याला टॅकल केले आणि सामन्यात पाहिल्यावेळेस राहुल बाद झाला. त्यानंतर लगेच त्याला रेव्हिवल मिळवले आणि रोहित परत रेडींगला गेला आणि परत तो बाद झाला आणि सामन्याचा पहिला हाफ संपला.
दुसरा हाफ चालू झाला आणि त्यानंतर पाटणाचा संघ ऑल आऊट झाला. सगळ्यांच्या नजारा राहुलच्या त्या विक्रमाकडे होत्या पण भरपूर वाट पाहूनही तो क्षण अनुभवता येत नव्हता आणि पुढच्या रेडला त्याने १ बोनसचा गुण मिळवला आणि पुढच्या रेडमध्ये बोनस मिळवून ५०० गुणांचा जादुई आकडा पार करण्याचा प्रयन्त केला पण त्याला यश आले नाही आणि परत प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेली.
राहुल पहिल्या हाफमध्ये दोन वेळेस सुपर टॅकल झाला होता त्यामुळे तो पटणाच्या गोटात जायचे तो टाळत होता. टायटन्सचा निलेश साळुंके गुण मिळवून देत होता पण राहुल थोडा नर्वस वाटत होता आणि परत तो जात होता आणि एम्प्टी रेड करून येत होता. डिफेन्समधील चांगल्या कामगिरीमुळे टायटन्स बढत घेत होता. जेव्हा राहुल पुढच्या वेळी परत रेडला गेला तेव्हा तो परत एकदा बाद झाला आणि आता आघाडी फक्त एक गुणांची राहिली.
प्रदीप नरवालने टायटन्सच्या संघाविरुद्ध सुपर रेड टाकली आणि सामन्यात खूप वेळानंतर पाटणाच्या संघाला बढत मिळवून दिली. त्यानंतरच्या रेडमध्ये त्याने दोन खेळाडूंना बाद करून तेलगू संघाला ऑल आऊट केले आणि आघाडी ३१-२६ अशी मिळवली. राहुलने ५वी एम्प्टी रेड टाकली. राहुल जेव्हा सहाव्या रेडसाठी गेला आणि परत त्याला ऍडव्हान्स टॅकल केले गेले. सामना संपण्याला २ मिनिटे कमी असताना निलेशने दोन गुण मिळवून पाटणाची बढत कमी केली.
पुढील रेडमध्ये प्रदीपने एक गुण मिळवला आणि त्याने सामन्यातील त्याचा १५वा गुण मिळवला. त्यानंतर राहुल रेड करण्यासाठी आला आणि परत बाद झाला आणि त्यानंतर राकेशने एक रेड केली त्यात त्याला एक गुण मिळाला. पण तेलगू टायटन्सने सामना गमावला. दुसऱ्या हाफमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्सने हा सामना २८-३३ च्या फरकाने आपल्या नावावर केला.
राहुल ५००वा गुण मिळवताना सलग ७ रेडमध्ये अपयशी ठरला तर त्या शेवटच्या सात रेडमध्येही तो तीन वेळेस बाद झाला. याच सामन्यात प्रदीप नरवालने दाखवून दिले की तो डुबकी किंग नसून कब्बडीचा किंग आहे.