भारतीय क्रिकेट इतिहासात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गणना दिग्गज फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी केली जाते. सचिन केवळ भारतच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत नेहमीच खास भूमिका निभावली आहे. इतरांना न जमणारे स्थान त्याने मिळविले आहे.
सचिनने (Sachin Tendulkar) कसोटी आणि वनडे क्रिकेट प्रकारात फलंदाजी करताना एकापेक्षा एक मोठे विक्रम आपल्या नावे केल्या आहेत. त्याने केलेल्या विक्रमांमुळे त्याला क्रीडाजगतात विक्रमी पुरूष म्हटले जाते.
सचिन एक वेगळ्या दर्जाचा फलंदाज होता. तो ज्या शैलीने फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडायचा, त्यामुळे चाहते त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होते.
सचिन तेंडुलकर नेतृत्व करण्याच्या बाबतीत अपयशी
आपल्या फलंदाजीच्या जोरावर सचिनने अनेक विक्रम केले आहेत. परंतु त्याचा संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम खूपच खराब राहिला आहे. सचिनने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना खूपच निराशाजनक विक्रम केला आहे. त्याचा नेतृत्वाचा प्रवास खास चांगला राहिला नाही.
सचिनने भारताकडून कसोटी आणि वनडे क्रिकेट प्रकारात एकूण ९८ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यात त्याला केवळ २७ सामान्यांमध्ये विजय मिळाला. तसेच ५२ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. त्याची सामना जिंकण्याची टक्केवारी ही २८ टक्के इतकी होती.
नेतृत्वादरम्यान सचिनने गांगुलीला दिली होती करियर संपविण्याची धमकी
जेव्हा १९९७ दरम्यान सचिन भारतीय संघाचा कर्णधार होता, तेव्हा विंडीजचा दौरा त्याच्या नेतृत्वाचा सर्वात वाईट काळ होता. त्या दौऱ्यावर बार्बाडोसमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यानंतर सचिनने सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) कारकीर्द संपविण्याची धमकी (Threatened) दिली होती.
खरंतर १९९७ मध्ये सचिनच्या नेतृत्वात बार्बाडोस कसोटी सामन्यात भारताला विंडीज संघाने १२० धावांचे आव्हान दिले होते. सपाट खेळपट्टीवर भारतासाठी हे आव्हान फार कठीण नव्हते. चौथ्या दिवशी भारताने केवळ २ धावा केल्या होत्या. यानंतर सचिनने विजयाची खात्री पटवून रेस्टॉरंटच्या मालकाला शॅम्पेन तयार ठेवण्यास सांगितले होते.
पराभवानंतर सचिनने गांगुलीवरच काढला होता आपला राग
परंतु त्या खेळपट्टीवर भारतीय संघाचे फलंदाज शेवटच्या दिवशी अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ ८१ धावांवरच संपुष्टात आला होता. या पराभवामुळे सचिन खूप नाराज झाला होता. त्यानंतर सचिनने सर्व खेळाडूंना आपल्या क्षमतेबद्दल सांंगितले. यानंतर गांगुली हा सचिनचे सांत्वन करण्यासाठी त्याच्याकडे गेलेला संघातील नवीन खेळाडू होता.
परंतु तत्कालीन कर्णधार सचिनने गांगुलीला म्हटले, की सकाळी धावण्यासाठी तयार रहा. त्यावेळी गांगुली सकाळी धावण्यासाठी पोहोचला नाही. त्यामुळे सचिनने गांगुलीला घरी पाठविण्याची आणि कारकीर्द संपविण्याची धमकी दिली होती. परंतु गांंगुलीने त्यानंतर खूप मेहनत घेतली आणि एक दिग्गज खेळाडू बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पार्थिव म्हणतो; होय, मी भारताकडून ग्लेन मॅकॅग्राला खेळताना पाहिलंय
-अनिल कुंबळेने त्याच्या मुलीसाठी दिला होता मोठा न्यायालयीन लढा
-…म्हणून तिसऱ्या द्विशतकाच्या वेळी रोहितची पत्नी रितिका ढसाढसा रडली