सचिन तेंडुलकर… हा तो क्रिकेटपटू आहे ज्याने क्रिकेटला लोकांच्या मनात रुजवण्याचे मोठे काम केले. १९८९ ते २०१३ या काळात सचिनने भारतीय क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली. तो मैदानावर उतरला की, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला पाहण्यासाठी उत्सुक असायचे. केवळ दर्शकच नव्हे तर भारतीय संघातील खेळाडूही सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर असायचे.
भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाही याला अपवाद नाही. रैनाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याच्या शालेय वयातील एका मदेजार किस्सा शेअर करत म्हटले की, “तो एकदा सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी शाळेतून पळून गेला होता. जेव्हा सचिनने १९९८मध्ये वनडेमध्ये ९ शतके केली होती. तेव्हा रैना ७वीला होता. त्याला आणि त्याच्या मित्रांना सचिनला एकदा तरी फलंदाजी करताना पाहायचे होते. त्यासाठी ते शाळेतून पळून गेले होते.”
रैना म्हणाला की, “आमच्या घरी अपट्रॉनचा टिव्ही होता. त्यावर फक्त दूरदर्शन दिसत असायचे. म्हणून मी आणि माझ्या काही मित्रांनी शेवटच्या २ पिरियड्समध्ये पळून जायचे ठरवले होते. त्यावेळी शारजाहमध्ये टूर्नामेंट चालू होती. महत्त्वाचे म्हणजे, त्याकाळात सचिन पाजी सलामीला फलंदाजी करत असायचे. आम्ही फक्त सचिन पाजी आणि राहुल द्रविडची फलंदाजी पाहायला जायचो. ते दोघे बाद झाल्यावर आम्ही सामनाच बघत नसायचो.”
सचिनच्या शारजाह येथील खेळीला ‘डेजर्ट स्टॉर्म’ म्हटले जाते. या सामन्यात सचिनने १४३ धावा करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सचिनने १३४ धावांची शतकी केली होती आणि भारताने कोका-कोला चषक जिंकला होता. “त्याची खेळी पाहून समालोचन करणारे टोनी ग्रेग जे स्वत: खूप मोठे क्रिकेटपटू होते, ते सचिनची प्रशंसा करत होते. सचिनच्या खेळीने त्यांच्या आवाजात जोर आला होता,” असे रैना पुढे म्हणाला.
पुढे सचिननंतर १५ वर्षांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाने सचिनबरोबरचं संघसहकारी म्हणून २००५ ते २०१२ या काळात तब्बल ७४ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले.
ट्रेंडिंग घडामोडी-
आम्ही काय फुटाणे विकत होतो काय? ‘या’ खेळाडूच्या वक्तव्यावर वैतागला इरफान
विश्वचषकात मानाची ‘गोल्डन बॅट’ मिळवण्याचा पराक्रम करणारे…
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! या दिवसापासून पाहणार विराट- रोहितला…