अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. हा सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. आता याच स्टेडियमवर चौथा कसोटी सामना तसेच कसोटी मालिकेनंतर होणारी ५ सामन्यांची टी२० मालिकाही होणार आहे. हे सामने पुर्नबांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहेत. तसेच या स्टेडियमचे नाव २४ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी असे ठेवण्यात आले आहे.
याआधी हे स्टेडियम सरदार वल्लभभाई स्टेडियम, मोटेरा अशा नावाने ओळखले जात होते. विशेष म्हणजे या स्टेडियमचा इतिहास मोठा असून जुने स्टेडियम (पुर्नबांधणी करण्याआधीचे मोटेरा स्टेडियम) अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. त्यातीलच एक क्षण म्हणजे भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी याच स्टेडियमवर १० हजार कसोटी धावांचा टप्पा ओलांडला होता.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी १९८७ साली पाकिस्तानविरुद्ध या स्टेडियमवर सामना खेळताना १०,००० कसोटी धावांचा टप्पा पार केला होता. त्यावेळी कसोटीमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्या सामन्यात गावसकरांनी १० हजार धावांचा टप्पा पार करताच प्रेक्षकांमध्ये इतका उत्साह संचारला होता की सामना २० मिनिटे थांबवावा लागला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी थेट मैदानात घुसुन गावसकरांना गराडा घातला होता. अखेर हा सामना काही काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Historic occasion for Sunil Gavaskar sir @Sunil_Gavaskar
Reached his 10000 runs in the same Test Played @ Ahmadabad vs Pakistan 4th Test 1986-87 Series @MazherArshad @WisdenIndia @WisdenCricket @ESPNcricinfo pic.twitter.com/ncXKM56MmC— Zohaib (Cricket King)🇵🇰🏏 (@Zohaib1981) July 10, 2020
या व्हिडिओमध्ये गावसकरांनी १० हजारावी धाव घेताच प्रेक्षक मैदानात घुसले. नंतर त्यांना बाहेर काढत असताना अन्य खेळाडूंनी गावसकरांचे अभिनंदन केले आहे.
गावसकरांनी त्यांच्या कारकिर्दीत १२५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी १०१२२ धावा केल्या असून त्यात ३४ शतकांचा आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन दिवसात कसोटी जिंकताच ट्विटरवर भारतीय संघासाठी आला कौतुकाचा पूर, पाहा काही हटके ट्विट
साल २०११ च्या विश्वचषकानंतर कारकिर्द संपुष्टात आलेले ३ भारतीय क्रिकेटर
जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट